राज्यात नव्या सब-व्हेरिएंटची एन्ट्री; राज्याच्या आरोग्य संचालकांडून मोठी माहिती

गेल्या आठवड्यात तमिळनाडू आणि तेलंगणामध्येही त्याची प्रकरणे नोंदवली गेली. 

Updated: May 29, 2022, 06:35 AM IST
राज्यात नव्या सब-व्हेरिएंटची एन्ट्री; राज्याच्या आरोग्य संचालकांडून मोठी माहिती title=

मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट बी.ए. 4 चे चार आणि बी.ए.5 यांचे तीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. दरम्यान यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत अजून भर पडली आहे.

दक्षिण आफ्रिकेसह जगाच्या काही भागांमध्ये एप्रिलमध्ये ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट आढळले होते, परंतु महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या आठवड्यात तमिळनाडू आणि तेलंगणामध्येही त्याची प्रकरणे नोंदवली गेली. 

राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, BA4 आणि BA5 हे ओमिक्रॉनचे सब-व्हेरिएंट आहेत, जे सौम्य मानले जातात. या सब-व्हेरिएंटबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचंही डॉ. आवटे यांनी सांगितलं आहे. 

आवटे म्हणाले, 'हे सब-व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य आहेत असून गेल्या काही आठवड्यांत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय परंतु रूग्ण मोठ्या संख्येने रूग्णालयात दाखल होत नाहीत. 

ओमायक्रॉनच्या या सब-व्हेरिएंटमुळे होणाऱ्या संसर्गामध्ये गंभीरता आढळली नाही. मात्र राज्याचे अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असंही डॉ. आवटे यांनी सांगितलंय.