प्रविण दाभोळकर, मुंबई : आज जागतिक थॅलेसेमिया दिवस.. भारताच्या लोकसंख्येतील 40 लाख जण 'थॅलेसेमिया मायनर' तर एक लाखजण 'थॅलेसेमिया मेजर' आहेत. यांच्या परस्पर संबंधातून होणाऱ्या मुलाला थॅलेसेमिया होण्याची शक्यता असते. अज्ञानामुळे या रोगाचं प्रमाण वाढू लागले आहे. या रोगात शरीरातील रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते.
आदित्य दिपक ठाकूर हा 10 वर्षाचा मुलगा आपल्या आईबाबांसोबत सायनच्या धारावीत राहतो. कामराज शाळेत 6 वी इयत्तेत शिकणारा आदित्य थॅलेसिमियाग्रस्त आहे. त्यामुळे आदित्यला दर 15 दिवसांनी रक्ताची गरज भासते. गेल्या पंधरा वर्षात शेकडो व्यक्तींशी त्याचं रक्ताचं नातं तयार झालं आहे. थॅलेसिमियाग्रस्तांचे आयुर्मान हे 30 वर्षांचे असते. आईवडील घाबरू नयेत म्हणून तो बिनधास्त राहतो.
आदित्यच्या आई बाबा दोघांनाही थॅलेसिमिया मायनर असल्याने आदित्य हा मेजर थॅलेसेमियाग्रस्त आहे. आदित्य 8 महिन्याचा असताना त्यांना याबद्दल कळाले. आदित्यला फुलाप्रमाणे जपणारी त्याची आई आता थॅलेसमियाबाबत जागृत झाली.
आदित्य सारख्या 400 मुलांच्या इच्छा 'द विशिंग फॅक्टरी' या संस्थेने पूर्ण केल्या आहेत. या संस्थेचे संस्थापक पार्थ ठाकूर हे देखील थॅलेसिमीयाग्रस्त आहेत. लग्नकरताना लग्नपत्रिकेतील 36 गुण पाहतो पण 37 वा महत्त्वाचा गुण हा थॅलेसिमिया रक्ततपासणी..