मुंबई : आजच्या जंक फूडच्या विश्वात पालेभाज्या, फळभाज्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. बच्चे कंपनीपासुन ते मोठ्यांपर्यंत पिझा, बर्गर अशा पदार्थांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. पण हे फास्ट फूड धूम्रपानापेक्षाही आरोग्यास अधिक घातक आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज 2017 च्या आकडेवारीनुसार, जगात २० टक्के लोकांचा मृत्यू फास्ट फूड खाल्याने होत असल्याचे समोर आले आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खव्वयांची पाऊले फास्ट फूडकडे वळतात. महत्वाचे म्हणजे अत्यंत व्यस्त शेड्यूलमुळे लोकांना बाहेरच्या अन्नाचा अस्वाद घ्यावा लागतो.
हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.के.के.अग्रवाल यांनी दिल्ल्या माहितीनुसार, 'आपल्या प्राचीन परंपरेने आपल्याला आहाराच्या समस्यांबद्दल सांगितले आहे. ते विविधता आणि मर्यादाच्या तत्त्वांचे समर्थन करतात, याचा अर्थ आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच प्रकारच्या पदार्थांचा समावेश असणे आरोग्यास लाभदायक आहे.
आपल्या रोजच्या आहारात सात प्रकारच्या रंगांचा (लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि पांढरा) समावेश असायला हवा. त्याचप्रमाणे सहा प्रकारच्या चवींचा (गोड, आंबट, खारट, कडू, मसालेदार आणि खरुज) समावेश असायला हवा. आपल्या पौराणिक गोष्टींमध्ये अन्न चक्रांची अनेक उदाहरणे आहेत, जसे उपवास आपल्यासाठी एक परंपरा आहे.
डॉ अग्रवाल यांच्या सूचना :
- कमी खा आणि हळूहळू खा, आपल्या जेवणाचा अस्वाद घेऊन खा.
- पानात फळांचा समावेश करा.
- ट्रान्स फॅट आणि जास्त साखर असलेल पदार्थ खाणे टाळा.
- पाण्याचे अधिक सेवन करा. बाहेरील कोल्डड्रिंक पिने टाळा
- सोडियमचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा.