'कोरोनावर मात करणारी, सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी लस ऑगस्टपर्यंत'

'ही लस सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी असेल'

Updated: May 16, 2020, 06:53 AM IST
'कोरोनावर मात करणारी, सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी लस ऑगस्टपर्यंत' title=

लंडन : कोरोनावर मात करणाऱ्या लसीवर संशोधन सुरु असून हे यशस्वी झाल्याल ही लस सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी असेल असे मत ऑक्सवर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक आणि संशोधकांनी व्यक्त केले आहे. ऑक्सवर्ड जेनर संस्थेचे संचालक अड्रायन हिल यांच्या ड्रगमेकर एस्ट्राझेनेका AstraZeneca (AZN.L)टीममार्फेत कोरोनावर मात करण्यासाठी लसीवर संशोधन सुरु आहे. ही लस सर्व कमी किंमतीत आणि सर्वत्र उपलब्ध असेल असे मत अड्रायन हिल यांनी व्यक्त केले आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. 

ही एक सिंगल डोस लस असून याचा जागतिक स्तरावर पुरवठा होणार आहे. ही लस सर्व ठिकाणांवर अगदी शेवटच्या रुग्णापर्यंत पोहोचावी अशी इच्छ हिल यांनी व्यक्त केली. 

संशोधन सुरु असलेली लस 'ChAdOx1 nCoV-19' या नावाने ओळखली जाते. कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी ही लस समोरुन लढा देतेय. सहा माकडांवर या लसीचे परीक्षण करण्यात आले. काही माकडांमध्ये एका डोसमध्येच वायरस विरुद्धची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुरुवात झाल्याचे १४ दिवसात दिसून आले तर इतरांना सर्वसाधारण २८ दिवसांचा कालावधी लागला. 

प्राण्यांवरील यशस्वी संशोधनानंतर मानवावरील या लसीचा प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास हिल यांनी व्यक्त केला. जुलै किंवा ऑगस्टपर्यंत ही लस सज्ज असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

कॅनडातही होणार प्रयोग 

एकीकडे चीन आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतानाच कॅनडा चीनच्या मदतीला धावला आहे. कॅनडाच्या नॅशनल काऊन्सिलने कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी चीनसोबत हातमिळवणी केली आहे. चीनची कंपनी आणि कॅनडाने संयुक्तपद्धतीने तयार केलेल्या Ad5-nCoV लसीचे प्रयोग कॅनडामध्ये होणार आहेत.

जगात कोरोनाचा कहर 

जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे संपूर्ण जगात 3 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर रुग्णांची संख्या 44 लाखांवर गेली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. येथे 84 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 13 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेनंतर रशियात सर्वाधिक कहर पाहायला मिळतोय. येथे 2 लाख 42 हजार 271 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ब्रिटनमध्ये 2 लाख 30 हजार 986 रुग्ण, स्पेनमध्ये 2 लाख 28 हजार 691 रुग्ण, इटलीमध्ये 2 लाख 22 हजार 104 रुग्ण, ब्राझीलमध्ये 1 लाख 90 हजार 137 रुग्ण, फ्रान्समध्ये 1 लाख 78 हजार 184 रुग्ण, जर्मनीत 1 लाख 74 हजार 98 रुग्ण, तुर्कीमध्ये 1 लाख 43 हजार 114 रुग्ण आणि इराणमध्ये 1 लाख 12 हजार 725 रुग्ण आढळले आहेत.