कानपूर : जर तुम्हाला असं वाटत असेल की कोरोना व्हायरस संपलाय आणि याचा धोकाही आता नाही तर तुम्ही चुकताय. तज्ज्ञांनी आता तिसरी लाट मंदावल्यानंतर थेट कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. 22 जूनच्या जवळपास कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाची ही चौथी लाट 24 ऑक्टोबरपर्यंत थैमान घालू शकते. दरम्यान कोरोना व्हायरसची ही चौथी लाट किती गंभीर असू शकते याचा काही अंदाज कोरोनाचा व्हेरिएंट समोर आल्यानंतरच समजू शकेल.
आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी सांगितलं की, कोरोनाची ही चौथी लाट चार महिन्यांपर्यंत टिकण्याची शक्यता आहे. ही बाब 24 फेब्रुवारीला प्रीप्रिंट सर्वर MedRxivवर पब्लिश झाली आहे.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चौथ्या लाटेचा कर्व 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत पीकवर येईल. दरम्यान याच्या गंभीरतोबद्दल आता काहीही सांगता येऊ शकत नाही.
आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी देशात कोरोनाच्या लाटेबाबत यापूर्वीही भाकीत वर्तवलं होतं. तिसर्या लाटेबद्दलचं त्यांचं भाकीत जवळपास अचूक ठरलं होतं. आयआयटी कानपूरच्या मॅथमेटिक्स आणि स्टॅटिस्टिक विभागाचे एसपी राजेशभाई, सुभ्रा शंकर धर आणि शलभ यांनी हे संशोधन केलंय. या अंदाजासाठी त्यांच्या टीमने सांख्यिकीय मॉडेल वापरलेत.