भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा

 भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

Updated: Mar 19, 2022, 12:32 PM IST
भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा title=

मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे विविध व्हेरिएंट्स पहायला मिळाले. अशातच आता चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट BA2 मुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. परिणामी यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

एका वेबसाईटशी बोलताना तज्ज्ञ सुभाष साळुंखे म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये देशातील नागरिकांची इम्युनिटी वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. त्यामुळे अधिक चिंता करण्याची गरज नाही. 

चिंतेच कारण नसलं तरीही आपण बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. कारण भारतात चौथी लाट येऊ शकते, जसं जगातील अनेक देशांमध्ये आली आहे. चौथी लाट नेमकी कधी येईल आणि ती किती तीव्र असेल याबाबत अजून कल्पना नसल्याचं, साळुंखे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचं 50 पेक्षा अधिक म्युटेशन

कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 50 पेक्षा अधिकवेळा म्यूटेशन झाली आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडला तेव्हा लोकांमध्ये चिंता वाढली होती. 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या, कोरोना दुसर्‍या लाटेचा धोका नाहीये. कारण BA2 हा व्हेरिएंट भारतता होता. असं असूनही आता मास्कचा वापर केला गेलाच पाहिजे. शिवाय कोरोनाच्या नियमांचंही पालन सुरू ठेवावं लागेल.