Skin Tips: त्वचेच्या समस्यासांठी आपण नवनवे उपाय शोधत असतो. पण काही गोष्टी या अशा असतात ज्याने तुमच्या चेहऱ्यावर फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. तेव्हा कुठलेही प्रोडक्ट आणि उपाय तुम्ही चेहऱ्यावर लावत असाल तर काळजीपुर्वक लावा कारण नाहीतर त्याचा वाईट परिणाम होईल आणि जर तुमच्या चेहऱ्यावर पिपल्स असतील तर तुम्ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
लिंबाचा रस - त्वचेच्या अनेक समस्यांमध्ये लिंबू फायदेशीर आहे परंतु चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास चुकूनही लिंबाचा रस वापरू नये. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते ज्यामुळे तुमची त्वचा जळू लागते आणि खाज सुटते आणि पिंपलची समस्या अधिक वाढू शकते. मुरुमांवर लिंबाचा रस लावल्याने रिअॅक्शन होऊ शकते त्यामुळे तुमची त्वचाही जळू शकते.
चामखीळ वर लसूण - चामखीळ घालवण्यासाठी लसूण लावली जाते परंतु चेहऱ्यावर लसूण वापरू नये. लसणामध्ये पोटॅशियम आणि सोडियम सारखे घटक असतात ज्याने त्वचा जळू लागते. ते लावल्याने त्वचेत तीव्र जळजळ होते. लसणाच्या वापराने चामखीळ दूर होऊ शकते परंतु चेहऱ्यावर जळलेल्या खुणा राहू शकतात.
Betnovate क्रीम - अनेक लोक त्वचेच्या प्रत्येक समस्येवर बेटनोवेट क्रीम लावू लागतात. बेटनोवेट क्रीम मुरुमांसाठी हानिकारक असतात. बेटनोवेट हे स्टिरॉइड आहे आणि ते लावल्याने त्वचेवर रिएक्शन्स येऊ शकतात.
बेकिंग सोडा - अनेक लोक त्वचेवर बेकिंग सोडा वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. बेकिंग सोडा चेहऱ्यावर लावल्याने त्वचा जळते कारण त्यात सोडियम बायकार्बोनेट असते जे चुन्यासारखे असते त्यामुळे त्वचेवर त्याचा वापर टाळावा.
(Disclaimer: येथे दिलेली सामान्य माहिती आहे. ती अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)