'या' 5 गोष्टींनी हृद्यविकाराच्या झटक्यानंतरही वाचवू शकाल प्राण

  International Congestive Heart Failure च्या 2017 साली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये आहे. 

Updated: May 21, 2018, 08:58 PM IST
'या' 5 गोष्टींनी हृद्यविकाराच्या झटक्यानंतरही वाचवू शकाल प्राण  title=

मुंंबई :  International Congestive Heart Failure च्या 2017 साली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये आहे. भारतामध्ये 23 % मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे होतो. हार्ट अटॅकनंतर वेळीच उपचार न मिळाल्याने हा त्रास बळावतो. हार्ट अटॅकमध्ये प्रामुख्याने छातीत वेदना होतात. हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत रूग्णांनी काही गोष्टींचं भान ठेवल्यास त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना मदत मिळू शकते. म्हणूनच तुमच्या परिवारातील किंवा आजुबाजूच्या एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यास 'या' गोष्टींचं भान अवश्य राखा. 
 
 खोकणं - 
 
 छातीत तीव्र वेदना होत असल्यास किंवा हार्ट आल्यास रुग्णाला चक्कर येण्याचा त्रास जाणवू शकतो. अशावेळेस त्यांना जोरात खोकण्यासाठी प्रवृत्त करा. यामुळे ब्लॉक झालेल्या धमन्या मोकळ्या होण्यास मदत होते. मात्र रूग्ण बेशुद्ध होत आहे असे वाटत असल्यास  हा उपाय करा. 
 
 मसाज -  
 
 छातीवर दोन्ही हातांनी दाब देऊन रूग्णाला बचावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. याकरिता रूग्णाला प्रशिक्षित व्यक्तीकडून छातीवर दाब देणं आवश्यक आहे. 
 
Sorbitrate गोळ्या -  

हार्ट अटॅक आल्यानंतर रूग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यापर्यंत त्याच्या जीभेखाली Sorbitrate किंवा डिस्प्रिनची गोळी जीभेखाली ठेवा. 

शांत रहा - 

हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा छातीत तीव्र वेदना जाणवत असल्यास रूग्णाने शांत राहणं गरजेचे आहे. अनेकदा हृद्याच्या ठोक्यामध्ये अनियंत्रितता असल्यास घाबरून रूग्ण जीव गमावतात. 

छातीतील वेदनांकडे दुर्लक्ष करू नका - 

कोणतेही काम करताना छातीत वेदना जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या. स्वतः धावाधाव करण्यापेक्षा जवळच्या व्यक्तीची मदत घ्या.