मुंबई : दिवाळी म्हटल की प्रत्येकाच्या आवडतीचा सण. सध्या सर्वत्र फक्त दिवाळी आणि दिवाळीच्या चर्चा आहेत. दिवाळीच्या दिवसांत दिवाळीची पहिली आंघोळ अत्यंत खास असते. या आंघोळीमध्ये अभ्यंगस्नानाचं विशेष महत्त्व आहे. उटण्याने दिवाळीच्या दिवशी आंघोळ करण्याची प्रथा आहे. आजकाल सार्यांचीच जीवनशैली अत्यंत व्यस्त झाली आहे. त्यामुळे बाजरातून तयार उटणं आणलं जातं. पण ते उटणं तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकतं.
त्यामुळे घरी देखील कमी वेळात उटणं तुम्ही तयार करू शकता. घरगुती उटणं बणवण्यासाठी लागणारं साहित्य. नागरमोथा, मुलतानी माती, गव्हचा कचरा, दारू हळद, आंबे हळद, साधी हळद, चंदनपावडर गुलाबपावडर हे सारे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या.
शरीरावर उटणं लावण्याआधी तेल नक्की लावा. उटणं लावण्याचे फायदे देखील आहेत.
- दिवाळी व्यतिरिक्तही नियमित चेहरा धुण्यासाठी, शरीरावरील मृत पेशींचा थर काढण्यासाठी उटणं फायदेशीर आहे.
- उटण्यामुळे शरीरात रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेला चालना मिळते.
- चेहर्यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी उटणं फायदेशीर आहे.