केवळ सजावट नव्हे तर खाऊही शकतात 'ही' फुले; केसांपासून त्वचेपर्यंत असे होतील फायदे

Edible Flower Benefits: केवळ घराची सजावटच नाही तर ही फुले आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जातात, तुम्हाला माहिती आहे का? 

Updated: Sep 5, 2023, 06:57 PM IST
केवळ सजावट नव्हे तर खाऊही शकतात 'ही' फुले; केसांपासून त्वचेपर्यंत असे होतील फायदे title=
flowers that are edible edible flowers ke fayde

Edible Flower Benefits in Marathi: आपण नेहमी फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी किंवा सणावाराला सजावटीसाठी करतो.परंतु या फुलांचे नानाविध उपयोग आहेत.शिवाय स्त्रियांची केसात फुले,गजरा माळण्याची परंपरा अगदी पुर्वापार आहे. पण या फुलांचा वापर हल्ली अनेक ठिकाणी करण्यात येतो. ही फुले आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात हे तुम्हाला माहिती आहे का.  

केळीचे फुल  ( Banana Flower) 

केळीच्या फुलांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. शरीरातील साखर देखील नियंत्रित केली जाते. केळीचे फुल मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

मोरिंगा ( Moringa Flower)

मोरिंगा फुलांचा वापर हा काही ठिकाणी अन्न तसेच औषध म्हणून केला जातो. मोरिंगामध्ये थायोसायनेट असते जे केसांना मजबूत करते तसेच केस गळणे थांबवते. याला एक नैसर्गिक कंडिशनर असे म्हणतात.

गुलाब (Rose) 

गुलाबाचे फुल हे प्रत्येकाचे आवडीचे फुल आहे. गुलाब फुलाचे पाणी म्हणजेच  गुलाब पाण्याचा तुमच्या केसांची तुमच्या केसांची गुणवत्ता सुधारण्यााठी होतो. 

जास्मिन (Jasmine)

जास्मिन फ्लॉवरच्या फुले केसांमधील घामाचा वास तसेच दुर्गंधी दुर करण्यासाठी केला जातो. 

गोकर्णी (Butterfly Pea) 

गोकर्णी ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. गोकर्णीच्या फुलांचा रंग हा गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो.गोकर्णीच्या फुलांची पावडर करुन पावडरचा चहा करता येतो. गोकर्णीच्या फुलांची चहा अत्यंत औषधी असून, मध किंवा गूळ घालून गोकर्णीची चहा घेतली जाते.

मोहरी (Mustard Flower)

मोहरीचा उपयोग आपण अन्नामध्ये करतो.डाळ किंवा इतर पदार्थ  बनवताना स्त्रिया जेवणात मोहरीचा वापर करतात.

भोपळ्याची फुले (Pumpkin Flower)

भोपळ्याची भाजी आपण रोजच्या जेवणात खातो.चमकदार पिवळ्या-नारिंगी भोपळ्याच्या फुलांना एक स्वादिष्ट चव असते. भोपळ्याच्या फुलांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात.