होळीच्या रंगांमुळे होणारे केसांचे नुकसान असे टाळा!

रंगबेरंगी सण होळी येताच सगळीकडे रंगाची उधळण होऊ लागते. 

Updated: Mar 1, 2018, 03:48 PM IST
होळीच्या रंगांमुळे होणारे केसांचे नुकसान असे टाळा! title=

मुंबई : रंगबेरंगी सण होळी येताच सगळीकडे रंगाची उधळण होऊ लागते. रंगात खेळण्याचा मोह आवरता येत नाही. मग त्यापासून केसांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. 

१. होळी खेळण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी केसांना कोरफड जेल किंवा खोबरेल तेल लावा. तेल लावल्याने केसांच्या होणारे नुकसान ९० % कमी होते. तेलामुळे फक्त रंगांमुळे होणारे नुकसान टाळता येते असे नाही तर केसांना तेल लावल्याने धूळ, ऊन यापासूनही केसांचे संरक्षण होते.

२. केस कर्ली असतील तर त्यांचा गुंता सहज होतो. त्यामुळे होळी खेळायला बाहेर पडण्यापूर्वी १५-२० मिनिटेआधी केसांना तेल नक्की लावा. 

३. केस जर लांब असतील तर ते मोकळे सोडून होळी खेळू नका. त्याची घट्ट वेणी किंवा आंबाडा बांधा. त्यामुळे केसांचं फारसं नुकसान होणार नाही.

४. होळी खेळून आल्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरने स्वच्छ धुवा.

५. त्याचबरोबर होळी रंगांमुळे केस कोरडे होतात. त्यामुळे केसांची चमक, मुलायमपणा पुन्हा आणण्यासाठी उत्तम प्रतीच्या सिरमचा वापर करा.