राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास 11 जिल्ह्यांत हल्यक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब होताना दिसत आहे. 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत असताना जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती असल्यामुळे 29 डिसेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी धुरक्याचे साम्राज्य अनुभवता आले. धुरक्याचा प्रभाव इतका तीव्र होता की, अगदी २००-३०० मीटर अंतरावरील वाहने, इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या. बोरिवली, मालाड, नेव्ही नगर, माहागाव, देवनार येथील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा अतिवाईट श्रेणीत गणली गेली.
शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच या परिसरात गारपीटीसह पावसाचा इशारा दिला आहे. तसेच रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातली काही तुरळक ठिकाणी राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहणार आहे. तसेच सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अगोदर निफाड, पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला त्यानंतर रात्री 11 वाजे नंतर मनमाड शहर परिसरात सोबत येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले अक्षरशः पावसाळ्या सारखा पाऊस हिवाळ्यात झाला असून अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या हंगामातील सर्वच पिकांना बसणार असून द्राक्ष कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, तूर, कापूस पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच ऐन हिवाळ्यात नागपूर शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान वातावरणातील बदलामुळे गारठा चांगलाच वाढला आहे.