केस पांढरे होत आहेत, घ्या संतुलीत आहार

 केस पांढरे होऊ नयेत म्हणून संतुलीत आहार घेण्याची गरज आहे. 

Updated: Jun 26, 2019, 03:54 PM IST
केस पांढरे होत आहेत, घ्या संतुलीत आहार title=

मुंबई : बदलती जीवनशैली आणि व्यग्र वेळापत्रकामुळे आरोग्यावर परिणाम होत असतो. केसांवरही त्याचा गंभीर परिणाम होतो. केस पांढरे होऊ नयेत म्हणून संतुलीत आहार घेण्याची गरज आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.

हिरव्या भाज्या
आहारात नेहमी हिरव्या भाजी-पाल्याचा समावेश करा, आहारात 'व्हिटॅमिन बी'चा समावेश झाल्यास केस पांढरे होत नाहीत.

कढीपत्ता
कढी पत्ता देखील केस अवेळी सफेद होण्यापासून बचाव करत असतो. केसांना मुळांपासुन मजबुत करण्यास काढीपत्ता फायदेशीर ठरतो. काढीपत्ता नारळाच्या तेलात उकळून ते तेल लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात.

रावस मासा
रावस मासा खाल्ल्याने केस पांढरे होत नाहीत, कारण रावस माशात सेलेनियम असते, सेलेनियम हार्मोन्सचे संतुलन राखण्यास लाभदायी आहे, म्हणून आठवड्यातून एकदा आहारात रावसचा समावेश करावा.

अक्रोड आणि बदाम
बदामात मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन-ई' असते, सकाळच्या न्याहारीत बादाम खा, यामुळे केस पांढरे होण्यापासून बचाव होऊ शकतो.

दुग्धजन्य पदार्थ
डेअरी उत्पादनांमध्ये 'व्हिटॅमिन बी' मोठ्या प्रमाणात असते. दुग्धजन्य पदार्थामुळे स्काल्पमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते, मात्र फॉलिक अॅसिड आणि बॉयोटीन कमी असल्याने केसांचा रंग सफेद होतो.