ग्रीन टी पिणंदेखील शरीराला त्रासदायक ?

तुम्ही रोज न चुकता ग्रीन टी घेता का ? आणि का घेऊ नये? अनेक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे.

Updated: Nov 4, 2017, 04:07 PM IST
ग्रीन टी पिणंदेखील शरीराला त्रासदायक ? title=

मुंबई : तुम्ही रोज न चुकता ग्रीन टी घेता का ? आणि का घेऊ नये? अनेक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे.

ग्रीन टीमुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. परंतु, ग्रीन टी चा अतिरेक करणे कितपत योग्य आहे? ग्रीन टी च्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरावर काही दुष्परिणाम होतात. 

खूप ग्रीन टी घेतल्याने काय होईल ?

The International Journal of Clinical and Experimental Medicine च्या अहवालानुसार असे दिसून आले आहे की, ग्रीन टी खूप प्रमाणात घेतल्याने लिव्हरचे कार्य सुरळीत होण्यास अडथळे येतात. त्यामुळे इन्फेकशन होण्याची शक्यता असते.

ग्रीन टी मध्ये असलेल्या tannins मुळे शरीरात आयर्नचे शोषण होण्यास प्रतिबंध होतो, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. याचा अर्थ तुमचे शरीर भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ यातून कमी प्रमाणात आयर्न शोषून घेते. तसंच ग्रीन टी च्या अधिक सेवनामुळे मांसाहारी पदार्थातून आयर्न शोषून घेण्याच्या प्रक्रीयेवर देखील परिणाम होतो. 

ऑटोइम्म्युनी आजार असल्यास दिवसातून १-२ कप ग्रीन टी घेण्यास काही हरकत नाही. ग्रीन टी मुळे इम्म्युनिटी सिस्टिमला चालना मिळते. परंतु, काही अभ्यासानुसार जर तुम्हाला कोणता आजार असल्यास ग्रीन टी चा दुष्परिणाम देखील होऊ शकतो. 

दिवसभरात किती ग्रीन टी घेणे योग्य ठरेल ?

ग्रीन टी चे जसे आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच दुष्परिणाम देखील आहेत. परंतु, दिवसातून तीन कप ग्रीन टी घेणे योग्य ठरेल. वजन कमी करण्यासाठी तीन कप ग्रीन टी घेणे पुरेसे आहे. तसंच त्यामुळे शरीरात आयर्नचे शोषण होण्यास अडथळा देखील येत नाही, असे न्यूट्रीशियनिस्ट Prema Kodical यांनी सांगितले.  रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतल्यास शरीरात अँटिऑक्सिडंट्सचे शोषण होण्यास मदत होते.