या आरोग्यदायी फायद्यांंसाठी उटण्याचा वापर नियमित करा

दिवाळीची सुरूवात नरकचतुर्दशीने होते.

health.india.com | Updated: Oct 10, 2017, 09:30 AM IST
या आरोग्यदायी फायद्यांंसाठी उटण्याचा वापर नियमित करा  title=

मुंबई : दिवाळीची सुरूवात नरकचतुर्दशीने होते.

या दिवशी पहाटे तेलाचा मसाज आणि सुगंधी उटण्याने आंघोळ करण्याची प्रथा आहे. मूळात उटणं हे नैसर्गिक स्क्रबर असल्याने त्याचा वापर केवळ दिवाळी पुरता मर्यादीत न ठेवता पुढेही कायम ठेवणं आरोग्यदायी आहे. म्हणूनच उटण्याचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या. 

1 त्वचा स्वच्छ करते 
उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब  मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते.

2 चेहर्‍याला नैसर्गिकरित्या चमक देते 
उटण हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत करते. तर बेसन त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. चंदनामुळे त्वचेत थंडावा राहण्यास मदत होते. तर यामध्ये दूध मिसळल्यास त्वचेला कांती मिळते.

3 चेहर्‍यावरील केसांची वाढ रोखते 
चेहर्‍यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहर्‍यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे निकाल अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट व उटणं याचे एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहर्‍यावर करावा.

4 त्वचेचे एजिंग कमी होते 
त्वचेवर सुरकुत्या पाहणे कोणाला आवडते ? पण वयानुसार त्यांचे येणे सहाजिकच आहे. उटणं लावल्याने ही समस्या कमी करण्यास मदत होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग, अ‍ॅन्टी ऑक्सिडेटीव्ह आनि दाहशामक क्षमता असते. यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. यामध्ये मध मिसळल्यास त्वचा मुलायम  होण्यास मदत होते.  यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघण्यासोबतच ते टाळणेदेखील शक्य होते.

उटण्याचे फायदे तर तुम्ही पाहिलेत मग हे उटणं दुकानातून विकत घेण्यापेक्षा तुमच्या सोयीनुसार घरच्या घरीदेखील बनवू शकता. मग पहा घरी झटपट उटणं कसं बनवाल ?