.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर

ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 16, 2017, 07:30 PM IST
.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर  title=

मुंबई : ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.

दगदग आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये उच्च रक्तादाबाचा त्रास वाढला आहे.  

सामान्यपणे रक्तदाबाचा त्रास म्हटला की मीठाचे पदार्थ खाणं आपण सहाजिकच टाळतो. पण काय खाणं टाळावे यासोबतच काय खावे ? याकडेही कटाक्षाने लक्ष देणं गरजेचे आहे. 

केळं का फायदेशीर ? 

केळ्यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रूग्णाला केळ्याचं सेवन आरोग्यदायी असल्याचे काही मेडिकल जर्ननमध्ये नमूद करण्यात आले आहे.  

हायपरटेंशनच्या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्या रूग्णाला हृद्यविकार, स्ट्रोक यांचा धोका वाढण्याची शक्यता असते. 

एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे 350 mg पोटॅशियम असते. तुमच्या आहारात पोटॅशियमची कमतरता असल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो. 

किती प्रमाणात केळं खाणं आरोग्यदायी ? 

रिसर्चच्या अभ्यासानुसार,  नियमित दोन केळ्यांचे सेवन केल्यास आठवड्याभरात सुमारे १०% त्रास कमी होण्यास मदत होते.