नवी दिल्ली : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींचा परिणाम माणसाच्या वजनावर होतो. वजन कमी करण्यासाठी रोज चालण्यापासून गरम पाणी पिण्यापर्यंत सर्व प्रयोग करतात.
पण त्यांचे वजन नियंत्रणात येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा भाजी बद्दल सांगणार आहोत जी खाल्ल्याने तुमचे वजन १५ दिवसात कमी होऊ शकते.
प्रत्येक घरात ही भाजी खाल्ली जाते. पण कदाचित तुम्हाला यातून मिळणाऱ्या फायद्याबद्दल माहित असेल.
हो..आपण बोलतोय वांग्याबद्दल. तुम्हीदेखील वांग्याच भरीत, भाजी खात असाल. पण याआधी तुम्ही याचा असा विचार क्वचितच केला असेल.
वाग्यांचे भरीत खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराला याचा चांगला फायदा होतो. ही केवळ भाजी नसून शरीराच्यादृष्टीने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यातील पोषक तत्व फायदेशीर ठरतात.
वांगे कापण्यासाठी धातूच्या सुरीचा उपयोग करु नये. याऐवजी स्टेनलेस स्टीलच्या सुरीचा उपयोग करावा.
धातूच्या सुरीने कारल्याने त्यातील फोटो केमिकल्स आणि धातू यामध्ये केमिकल रिअॅक्शन होण्याची शक्यता असते.
वांग्याची भाजी बनविण्याआधी वांगी कापून मिठाच्या पाण्यात काहीवेळ ठेवा. वांग्यात ज्या पदार्थामूळे कडवटपणा येतो तो पदार्थ यामूळे नष्ट होतो.