नवी दिल्ली : तुपाचे नाव ऐकताच जाड होणार, असे आपल्या मनात येते. तुपासंबंधी असे अनेक समज आपल्या मनात आहेत. यामुळे त्याच्या फायद्यांकडे आपले दुर्लक्ष होते. तूपामध्ये व्हिटॉमिन, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशियम हे पोषकघटक असतात. त्यामुळे तूप योग्य प्रमाणात खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. हे आहेत तुपाचे फायदे...
मेडिकल रिसर्चनुसार असे दिसून आले आहे की, तूप खाल्याने मेंदू तल्लख राहतो. सांधेदुखीच्या त्रासावर तूप खाणे लाभदायी ठरते. केसांना तूपाने मसाज केल्यास केस लवकर सफेद होत नाहीत. तर त्वचेवर तूप लावल्याने त्वचा चमकदार होते.
तूपाच्या सेवनाने रक्त आणि आतड्यात असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. त्याचबरोबर ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित असल्यास हृदय योग्य रितीने कार्य करते. हृद्यासंबंधित इतर आजार होण्याची संभावना कमी होते. देसी तूपात व्हिटॉमिन K-2 चे प्रमाण अधिक असते. या व्हिटॉमिनमुळे रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. परिणामी रक्ताभिसण सुधारते.
देसी तुपामुळे शरीरात जमा झालेले अतिरीक्त फॅट बर्न होण्यास मदत होते. या फॅट्सचे व्हिटॉमिनमध्ये रुपांतर होते आणि यामुळे अन्न लवकर पचते. मेटाबोलिझम सुधारते. त्याचबरोबर बद्धकोष्ठता आणि पोटाचे इतर विकार ठीक होण्यास मदत होते. शरीरात एनर्जी लेव्हल कायम राहते.