मुंबई : पुदीन्याची चटणी जवळपास सर्वांना आवडते असेल. स्वाद देण्याव्यतिरिक्त पुदीन्याची अनेक वैशिष्ट्यही आहेत. पुदीन्याची पानं आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी प्रभावी ठरतात. पुदिनाच्या पानांमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असते. शिवाय यामध्ये प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसंच व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्सच्या प्रमाणामुळे शरीर आरोग्यदायी राखण्यास मदत होते.
इतकंच नव्हे तर पुदीन्याचे अजून बरेच फायदे आहेत. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुदिना रक्ताच्या पीएचला अॅसिडिक होऊ देत नाही. त्याचप्रमाणे पुदीना हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा करण्यास फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया पुदीन्याचे अजून काही फायदे-
पुदिन्याच्या वापरामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे पुदिनाचे सेवन केल्यानंतर खोकल्यापासून आराम मिळतो असा दावा आहे. घशामध्ये जर जळजळ होत असेल तर त्यावरही पुदीना उपयुक्त असतो.
वजन नियंत्रित आणण्यासाठी पुदिना अत्यंत उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुदिनामुळे जेवलेलं चांगल्या पद्धतीने पचतं. उत्तम मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास फायदेशीर असतो. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर पुदीन्याचं सेवन करा.
पुदिनामुळे तोंडाचं आरोग्य उत्तम राहू शकतं. पुदिना तोंडाच्या आत वाढणाऱ्या बॅक्टेरियांना प्रतिबंध करतो. इतकंच नव्हे तर दातांवरील डाग दूर करण्यास पुदिनाची मदत होते. पुदिनाची पानं चावल्याने तोंडाला दुर्गंधी येत नाही.
कोरोनाच्या कठीण काळात संसर्ग रोखण्यासाठी शरीरात चांगली इम्युनिटी पॉवर असण्याची गरज आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुदिन्याच्या चटणीचा आहारात समावेस करा. शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने शरीरातील विविध प्रकारच्या तक्रारी दूर होतील.