आरोग्याच्या 'या' समस्यांवर कडुलिंब उपयुक्त!

गुढी उभारताना आपण त्याला कडूलिंबाचा पाला लावतो आणि प्रसाद म्हणून खातोही. 

Updated: Mar 16, 2018, 11:05 AM IST
आरोग्याच्या 'या' समस्यांवर कडुलिंब उपयुक्त! title=

मुंबई : मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुढी उभारताना आपण त्याला कडूलिंबाचा पाला लावतो आणि प्रसाद म्हणून खातोही. ही आपली परंपरा नक्कीच काहीतरी आरोग्यदायी संदेश देत असणार. कारण आपल्या सर्वच परंपरा तशा अर्थपूर्ण आहेत. तर कडूलिंबाचे काय फायदे आहेत आपण जाऊन घेऊया...

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी-

गरम पाण्यात कडूलिंबाची पाने ३० मिनिटे ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करा. त्यामुळे शरीराची दुर्गंधी आणि इंफेक्शन दूर होण्यास मदत होईल.

रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रित होण्यासाठी-

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक परिणामकारक आणि नैसर्गिक उपाय म्हणजे कडूलिंब. उत्तम परिणामांसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा कडूलिंबाचा रस प्या.

कोंड्यापासून बचावात्मक-

कडूलिंबाची काही पाने वाटून त्याची पेस्ट बनवा. ती खोबरेल तेलात मिक्स करा. केसांना हे तेल लावा. १५-२० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. कोंडा कमी होईल आणि केसगळतीही दूर होण्यास मदत होईल.

फंगल इंफेक्शनपासून सुटका-

कडूलिंबाची काही पाने सुकवून वाटून त्याची पावडर बनवा. त्यात चंदन पावडर आणि गुलाबपाणी नीट मिक्स करा. फंगल इंफेक्शनवर उपाय म्हणून ही पेस्ट संबंधित जागी लावा.

घसादुखी-

एक ग्लास पाण्यात ३ कडूलिंबाची पाने टाकून पाणी उकळवा. त्यात चमचाभर मध घाला आणि त्या पाण्याने गुळण्या करा. घसादुखी दूर होईल.