मुंबई : गुलाबाला फुलांचा राजा संबोधले जाते.
केवळ सजावटीसाठी किंवा सुवासिक फूल म्हणून गुलाबाची ओळख नाही. तर गुलाबाचा वापर औषधी कारणांसाठी केला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
गुलाबाचा वापर लठ्ठपणाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी केला जातो. याकरिता तुमच्या घरात आता चांगल्या दर्जाचे / योग्य नर्सरीतून गावठी गुलाबाचे झाड लावा.
गुलाबाच्या पाकळ्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास लठ्ठपणाचा त्रास आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते.
गुलाबाच्या 10-15 पाकळ्या पाण्यात घालून उकळा. पाणी उकळल्यानंतर त्याचा रंग चॉकलेटी होईल.
पाण्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा.
गुलाबाच्या पाकळ्याच्या अर्कामध्ये मध आणि वेलची पूड मिसळून हे पाणी दिवसातून दोनदा प्यावे.
गुलाबाचा गुलकंद बनवला जातो. उन्हाळाच्या दिवसामध्ये गुलकंदाचे नियमित सेवन केल्यास डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. मात्र मधूमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गुलकंदाचे सेवन करावे.
गुलाबाच्या पाकळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचा साठा असतो. त्यामुळे नियमित गुलाबाच्या पाकळ्यांचा किंवा गुलकंदाचे सेवन केल्यास सांध्यांचे दुखणे नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
व्यस्त आणि दगदगीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजारांचा धोका वाढला आहे. अशावेळेस आजारपणाशी लढण्यासाठी रुग्णाची रोगप्रतिकारक्षमता उत्तम असणं हेदेखील गरजेचे आहे. तुम्हांला शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारायची असेल तर गुलाबच्या पाकळ्यांचा आहारात समावेश वाढवावा.
गुलाबाच्या पाकळ्यांमधील अॅन्टीऑक्सिडंटचा मुबलक साठा असतो. त्यामुळे नियमित सकाळी रिकाम्या पोटी 2-3गुलाबाच्या पाकळ्यांचा आहारात समावेश वाढवावा.