कोरोना महामारी जाऊन काहीच दिवस झाले आहेत. असं असताना आणखी एका Silent Pendamic ने डोकं वर केलं आहे. वैज्ञानिकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुरशीजन्य संसर्गावर उपचार करताना त्याचा प्रभाव अधिक होत आहे. एवढंच नव्हे तर याच्या उपचाराकरिता वापरली जाणारी औषधे प्रभावहिन होत असल्याच संशोधनात आढळलं आहे.
यूकेमधील मँचेस्टर विद्यापीठातील आण्विक जीवशास्त्रज्ञ नॉर्मन व्हॅन रिझन यांच्या मते, जागतिक आरोग्य चर्चांमध्ये बुरशीजन्य रोगजनक आणि अँटीफंगल प्रतिरोधकतेच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तातडीचे लक्ष न दिल्यामुळे किंवा कारवाई न केल्यामुळे बुरशीजन्य संक्रमण वर्षाला 6.5 दशलक्ष लोकांना संक्रमित करतात. एवढंच नव्हेतर यामुळे दरवर्षी 3.8 दशलक्ष लोकांचा बळी घेतला जातो. याकडे लक्ष दिलं नाही तर हा आकडा आणखी धोकादायक बनू शकतात, अशी चेतावणी संशोधकांनी दिली आहे. बुरशीजन्य संसर्ग हा काही विशिष्ट आजार किंवा लोकांना होत नाही. तर याचा प्रभाव कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना होत आहे.
नॉर्मन व्हॅन रिजन आणि शास्त्रज्ञांचा एक आंतरराष्ट्रीय गट सरकार, संशोधन समुदाय आणि फार्मास्युटिकल उद्योगाला “ बॅक्टेरियाच्या पलीकडे पाहा” असं आवाहन करत आहे. प्रतिजैविक प्रतिकाराचा सामना करण्यासाठी अनेक उपक्रमांमधून बुरशीजन्य संसर्ग सोडला जात आहे, संशोधक म्हणाले की, त्वरित लक्ष न दिल्यास बुरशीजन्य संसर्ग आणखी धोकादायक बनू शकतो, सायन्स अलर्टने अहवाल दिला.
चीन, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन, या देशांतील संस्थांमधून आलेल्या नॉर्मन व्हॅन रिजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, "गेल्या दशकांमध्ये औषधांच्या प्रतिकारशक्तीच्या समस्यांची संख्या पाहता, जीवाणूंकडे असमान लक्ष देणे चिंताजनक आहे." यूके, ब्राझील, यूएस, भारत, तुर्कस्तान आणि युगांडा यांच्यावर बुरशीजन्य रोगांचे परिणाम आहेत. ज्याला सरकारने मोठ्या प्रमाणात मान्यता दिली नाही."
एस्परगिलस फ्युमिगॅटस सारख्या बुरशीजन्य रोगाचा फुफ्फुसांवर आणि कॅन्डिडा म्हणजे जीभेवर परिणाम होते. ज्यामुळे तयार होणार यीस्ट संसर्गामुळे सर्वात धोकादायक मानले जाते. आउटलेटनुसार, कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेले लोक आणि वृद्ध प्रौढांना सर्वाधिक धोका असतो.
शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, जीवाणू आणि विषाणूंच्या तुलनेत, बुरशी हे अधिक क्लिष्ट जीव आहेत, ज्यामुळे शरीरातील इतर महत्त्वाच्या पेशींना हानी न करता बुरशीच्या पेशी नष्ट करणारे औषध विकसित करणे शास्त्रज्ञांना कठीण आणि अधिक महाग होते. सध्या, अँटीफंगल औषधांचे फक्त चार वर्ग आहेत आणि त्यांचा प्रतिकार वाढत आहे.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.