नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून पुढील पाच वर्षात मधुमेह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात मधुमेहींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, येणाऱ्या पाच वर्षात या रोगाच्या रुग्णांच्या संख्या २६६ टक्के इतकी वाढण्याची शक्यता आहे. श्रीपाद येसो नाईक यांनी शुक्रवारी लोकसभेत मधुमेहावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, भारतात २०२५ पर्यंत मधुमेह रुग्णांची संख्या ६.९९ कोटींपर्यंत पोहचू शकते.
सरकार जेथे विविध प्रसंगी मधुमेहापासून बचावासाठी अभियान चालवत आहे, तेथे आता मधुमेहाच्या उपचारासाठी हर्बल औषधांना प्राधान्य दिलं जात आहे. काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक एन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अर्थात 'सीएसआयआर'च्या मदतीने हर्बल औषधांचा शोध लावण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधील भारत सरकारच्या संशोधन संस्थेने मधुमेहासाठी हर्बल औषधं बनवली आहेत. ही हर्बल औषधं वैज्ञानिकदृष्ट्या वैध आहेत. सध्या, एमिल फार्मा कंपनी मधुमेहावरील या औषधांचं उत्पादन करत आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक म्हणाले की, मंत्रालयांतर्गत 'सीएसआयआर'च्या शास्त्रज्ञांनी विस्तृत, सखोल अभ्यासानंतर बीजीआर-३४ नावाचं औषध तयार केलं आहे. त्या औषधात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त अशी अनेक औषधं आहेत.