Health Tips : गरम पाणी पिताय का? थांबा शरीराला होऊ शकतं मोठं नुकसान!

कोमट पाणी पिणं म्हणजे अति गरम पाणी पिणे नाही

Updated: Sep 25, 2022, 06:54 AM IST
Health Tips : गरम पाणी पिताय का? थांबा शरीराला होऊ शकतं मोठं नुकसान! title=

मुंबई : प्रत्येक व्यक्ती आरोग्य (Health) चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते घरगुती उपाय (Home Remedies) करतात. यामधील एक उपाय म्हणजे गरम पाणी. पोट साफ होण्यासाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठण्यापूर्वी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचं सेवन करतात. त्यामुळे पोट साफ होतं पण गरम पाणी (Hot Water) पिण्याच्या प्रक्रियेत लोक अनेकदा जास्त गरम पाण्याचे सेवन करतात.

पण कोमट पाणी पिणं म्हणजे अति गरम पाणी पिणे नाही. अति गरम पाणी प्यायल्यामुळे लोकं इतर समस्यांना बळी पडतात. त्यामुळे या समस्यांबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. गरम पाणी पाण्याने शरीराला खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही गरम पाणी पिण्यापूर्वी त्यामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकतं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गरम पाणी पिण्यामुळे होणारं नुकसान 

निद्रानाशाची समस्या

जेव्हा एखादी व्यक्ती गरम पाण्याचं सेवन करते तेव्हा त्याचा झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. वारंवार लघवी होत असल्याने व्यक्तीला निद्रानाशाची समस्याही होऊ शकते.

आतड्यांशी संबंधित समस्या 

आतड्यांसारख्या अंतर्गत अवयवांवरही गरम पाण्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जे लोकं आधीच आतड्यांसंबंधी समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांनी गरम पाणी पिण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

उष्माघाताची समस्या 

जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले तर यामुळे व्यक्तीला उष्माघाताची समस्या देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत उन्हात बाहेर जाताना फक्त सामान्य पाणी प्या.

जीभेचं नुकसान

गरम पाण्याचे सेवन केल्यानेही जीभेचं नुकसान होऊ शकतं. याशिवाय गरम पाण्याचा घसा, ओठ इत्यादींवरही परिणाम होऊ शकतो.