Google Wallet features : भारतात मागील काही वर्षांपासून आर्थिक देवाणघेवाणीसाठी डिजीटल पद्धतींचा वापर केला जात आहे. भारतातील या आर्थिक देवाणघेवाणीचा आदर्श आणि ख्याती अगदी परदेशापर्यंत पोहोचली असून अनेक देशांमध्ये युपीआयच्या धर्तीवर Payment प्रक्रिया अवलंबण्यात येताना दिसत आहे. भारतानं या प्रगतीच्या मार्गावर आणखी एक उल्लेखनीय पाऊल टाकलं असून, येत्या काळात काही मोठे बदलही त्या धर्तीवर अपेक्षित आहेत. कारण, भारतात नुकतंच गुगल वॉलेट लाँच करण्यात आलं आहे.
अँड्रॉईड युजर्स प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करून घेऊ शकतात. या माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड आणि गिफ्ट कार्ड स्टोअर करता येणार असून, या माध्यमातून Digital Payment अगदी सहजगत्या करता येणार आहे.
गुगल वॉलेटच्या माध्यमातून अँड्रॉईड युजर्स सिनेमाची तिकिटी, बोर्डिंग पास save करता येणार आहेत. हे अॅप गुगल पे हून अतिशय वेगळं असणार आहे. कारण, जिथं गुगल पेचा वापर पैशांच्या देवाणघेवाणीसाठी आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी केला जातो. गूगलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार Gpay हे कंपनीचं केंद्रस्थानी असणारं प्राथमिक अॅप असून त्याचा वापर सुरूच राहणार आहे. Google wallet हे अॅप Non Payment कामांसाठी तयार करण्यात आलं आहे.
सुरुवातीला Google pay ला अँड्रॉईड पेच्या नावानं ओळखलं जात होतं. मोबाईल पेमेंट सर्विससाठी ते तयार करण्यात आलं होतं, ज्या माध्यमातून मोबाईल, टॅबलेटनं पैशांची देवाणघेवाण करता येणं सहज शक्य झालं. पिन, पासकोड किंवा बायोमॅट्रिक्सच्या मदतीनं हा व्यवहार करता येतो. हे अॅप सध्या 79 देशांमध्ये उपलब्ध आहे.
दरम्यान, सध्या चर्चेत असणाऱ्या गुगल वॉलेटच्या माध्यमातून डिजिटल डाक्यूमेंट्स एका ठिकाणी सुरक्षित ठेवता येणार आहेत. Google नं केलेल्या दाव्यानुसार या अॅपमुळं दैनंदिन आयुष्यातील अनेक कामं सुकर होणार आहेत. सध्याच्या घडीला गुगलकडून या अॅपसाठी भारतातील जवळपास 20 मोठ्य़ा ब्रँडशी करार करण्यात आले आहेत. यामध्ये एयर इंडिया, इंडिगो, फ्लिपकार्ट, पाइन लॅब्स, पीव्हीआर आयनॉक्सचा समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतानाही तुम्हाला या अॅपचा सहज वापर करता येणार आहे.