पायाच्या तळव्यांना खाज येते, गरम होतात; 'या' गंभीर आजाराचे आहे पहिले लक्षण

Health Tips For Liver:  लिव्हरमध्ये एखादा बिघाड झाला असेल तर आधीच शरीरात तसे संकेत दिसतात.  यकृत खराब होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 15, 2023, 05:29 PM IST
 पायाच्या तळव्यांना खाज येते, गरम होतात; 'या' गंभीर आजाराचे आहे पहिले लक्षण title=
health tips in marathi feet shows 5 symptoms that indicates fatty liver disease

Signs of Liver Disease: एखाद्या गंभीर आजाराच्या आधी आपले शरीर आपल्याला संकेत देत असतात. मात्र, आजाराची लक्षणे माहिती नसल्यामुळं अनेकदा या संकेतांकडे दुर्लक्ष केले जाते. कधीकधी कामाच्या गडबडीतही व्यक्ती आपल्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष होते. साधारणतः कान, नाक, डोळे, नाक या अवयवांबाबत जास्त जागरुक असतो. मात्र, किडनी, यकृत, स्वादुपिंड या अवयवांकडे दुर्लक्ष करण्यात येते. कारण या अवयवांच्या आजारांबाबतचे संकेत खूप उशीरा मिळतात. मात्र, असेही काही संकेत आहेत ज्यांचा नीट अभ्यास केल्यास तुम्ही आधीच आजारांबाबत जागरुक राहू शकाल. पायाचे तळवे लाल दिसत असतील तर हे सुद्धा एका गंभीर आजाराचे लक्षण आहे. 

द योगा इन्स्टीट्युट ऑफिशयलने दिलेल्या माहितीनुसार, पायाचे तळव्यामुळंही तुम्हाला लिव्हरच्या आजारांचे संकेत मिळतात. फॅटी लिव्हर, ब्लड सर्कुलेशन, अशुद्ध रक्त यासारखे संकेत पायाचे तळव्यामुळं दिसून येतात. जाणून घेऊया या लक्षणांबाबत. 

तळव्यांना सूज येणे

तळव्यांना सूज येणे किंवा चालताना वेदना जाणवणे ही सामान्य समस्या जरी असली तरी दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते. तळव्यांना सूज येणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण आहे. जेव्हा लिव्हरमध्ये फ्लुइड जमा होते किंवा फॅटी लिव्हरची समस्या तीव्र होते, तेव्हा तळव्यांना सूज येते. 

तळवे गरम होतात. 

काही जणांचे तळवे प्रमाणाबाहेर गरम होतात. अगदी चप्पल किंवा शूज घातल्यानंतरही असा अनुभव येतो. हे लिव्हर माल्फंक्शनचा संकेत असू शकते. म्हणजे लिव्हर योग्यरितीने रक्त साफ करु शकत नाहीये. 

तळव्यांना खाज येणे

तळव्यांना खाज येणे हे जरी सामान्य वाटत असले तरी हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. हृदयासंबंधित विकार असल्यास तळव्यांना खाज सुटते. हृदय विकारामुळं लिव्हरमध्ये कंजेशन होते आणि त्यामुळं तळव्यांना खाज सुटते. 

पायांच्या नसा दिसणे

स्पायडर वेन्स म्हणजेच निळ्या-जांभळ्या रंगाच्या नसा. पायाच्या तळव्यामध्ये या नसा दिसल्यास एस्ट्रोजन वाढल्याचे लक्षण असते. जेव्हा लिव्हर काम करायचे बंद होते तेव्हा शरीरात एस्ट्रोजन हार्मोन्स वाढते. 

पायाच्या तळव्यांवर डाग पडणे

काही जणांच्या पायाच्या तळव्यावर डाग असलेले दिसतात. याचाच अर्थ तुमच्या शरीरात रक्त प्रवाह नीट होत नाहीये. यामुळं लिव्हरचे कार्य खंडित होते आणि पायांचे दुखणे वाढते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)