'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट असल्याचं म्हटल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता थेट पाकिस्तानमधून तिला धमकी आली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 1, 2024, 04:45 PM IST
'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अभिनयापेक्षा क्रिकेटमुळे जास्त चर्चेत असते. टीम इंडियाचा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतशी (Rishabh Pant)उर्वशी रौतेलाच (Urvashi Rautela) नाव जोडलं जात होतं. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहमुळे (Naseem Shah) उर्वशी रौतेला चर्चेत आहे. उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात उर्वशी आपल्या फेव्हरेट पाकिस्तानी क्रिकेटरचा उल्लेख करताना दिसत आहे. एका कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे.

Add Zee News as a Preferred Source

पाकिस्तानी क्रिकेटर फेव्हरेट

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तुझा फेव्हरेट पाकिस्तान क्रिकेटर कोण आहे असा प्रश्न उर्वशीला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उर्वशीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह आपला फेव्हरेट खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्ताचा संघ चांगला असून नसीम शाह फेव्हरेट असल्याचं तीने म्हटलंय.

आमच्या खेळाडूपासून दूर रहा

नसीम शाह फेव्हरेट म्हणण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंर उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे इतकंच नाही तर तिला धमक्याही येऊ लागल्या आहेत. पाकिस्तानच्या काही क्रिकेट चाहत्यांनी उर्वशीला नसीम खानपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. तर काही क्रिकेट चाहत्यांनी आमच्या मुलांची पाठ सोड असा धमकीवजा इशारा दिला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवत आपला राग व्यक्त केला आहे. उर्वशीला जास्त ट्रोल करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान क्रिकेट आणि नसीम शाहचे चाहते आहेत.

नसीमबरोबर उर्वशीचं नाव

उर्वशी रौतेला आणि नसीम शाहचं नाव याआधीही चर्चेत होतं. काही वर्षांपूर्वी उर्वशी रौतेला आणि नसीम शाह रिलेशनमध्ये असल्याची जोरदार अफवा पसरली होती. यानंतर उर्वशीवर भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. यानंतर एका मुलाखतीत नसीम शाहने उर्वशी रौतेला कोण आहे, आपल्याला माहित नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला होता.

About the Author