शरद ऋतुत वाढतो पित्तदोष; आयुर्वेदानुसार ऑक्टोबर हिटमध्ये 'असा' घ्या आहार!

Ayurvedic Diet for October: हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. या महिन्यात आहार कसा असावा जाणून घेऊया. 

| Updated: Oct 8, 2023, 04:09 PM IST
शरद ऋतुत वाढतो पित्तदोष; आयुर्वेदानुसार ऑक्टोबर हिटमध्ये 'असा' घ्या आहार! title=
health tips in marathi Ways to tackle October heat in Ayurved

Ayurvedic Diet for October:  पावसाळा संपून हिवाळा येण्याआधीचा ऋतु म्हणजे शरद ऋतु. यालाच ऑक्टोबर हिट असं म्हणतात. या कालावधीत दीड ते दोन महिने उष्णता जाणवू लागते. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीरातील पित्त साठून राहिलेले असते. त्याचा प्रकोप शरद ऋतुमध्ये होतो. त्यामुळं या काळात पित्ताचे आणि रक्ताचे आजार वाढीस लागतात. अशावेळी हवामानात झालेल्या बदलानुरुव आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. ऑक्टोबर महिन्यात काय आहार घ्यावा आणि काय टाळावे, हे जाणून घेऊयात. (October Heat Diet)

ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते. त्यामुळं अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. वाढलेल्या पित्त दोषाने त्रास होऊ नये म्हणून आहारात काय असावे  हे जाणून घेऊया. ऑक्टोबर महिन्यात आहार हा कमी मात्रेत व भूक लागल्यानंतरच घ्यावा. जेवणात दोन वेळेला साजूक तूप घ्यावे. त्याचबरोबर ताजा आवळा, काळ्या मनुका, खजूर अंजीर इतक्यादी फळे खावीत. 

भाज्यांमध्ये मूग, मसूर, कारले, पडवळ, भोपळा, दुधी भोपळा इ भाज्या व डाळी आहारात प्रामुख्याने असाव्यात. त्याचबरोबर बाहेरुन घरात आल्यावर थंड पाणी पिण्यापेक्षा आवळा सरबत किंवा कोकम सरबत घ्यावे. 

ऑक्टोबर महिन्यात या गोष्टी टाळाव्यात 

आहारात मोहरीचे किंवा तीळाचे तेल वापरणे टाळावे. तसंच, दही, बेकरी उप्तादने, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. जास्त वेळ उन्हात फिरु नका. त्याचबरोबर दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे टाळावे. मद्यसेवन करु नका. 

फळांचे सेवन करा. 

ऑक्टोबर महिन्यात उष्माघाताचा त्रास झाल्यास ताजी फळे, पालेभाज्यांचा वापर आहारात करा. जड अन्नपदार्थ खाणे टाळा. कारण त्यामुळं शरीराचे तापमान वाढू शकते. टरबूज, द्राक्षे, अननस, गाजर, काकडी, कच्चा पांढरा कांदा अशी शरीराला थंडावा देणारी फळे खा. जेवणात गरम मसाले आणि तिखटाचा वापर कमी करावा. 

शरद ऋतुतील हवामान

शरद ऋतुत पूर्वेकडून वारे वाहत असतात. त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. शीतल वाऱ्यामध्ये अतिमधुरतेचे गुण भरलेले असतात. असे असले तरी त्याच्यामध्ये वात वाढवण्याचा दोष असतो त्यामुळं वातप्रकृती व्यक्तींसाठी तो हानिकारक असतो. तसंच, ज्यांच्या शरीरावर जखमा आहेत तसंच, अंगावर सूज आहे त्यांच्यासाठी शरद ऋतुत पूर्वेकडून वाहणारे वारे बाधक ठरतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)