Rujuta Diwekar सांगतेय वजन कमी करताना 5 चुका टाळा, यामुळेच होत नाही Weight Loss

Weight Loss Mistakes: वजन कमी करताना लोक अनेक छोट्या-मोठ्या चुका करतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्याकडून जाणून घ्या वजन कमी न होण्याची कारणे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 7, 2023, 06:59 AM IST
Rujuta Diwekar सांगतेय वजन कमी करताना 5 चुका टाळा, यामुळेच होत नाही Weight Loss  title=

Weight Loss Tips : वजन कमी करणे ही फक्त एक मेहनत नाही तर यामध्ये सातत्य आणि दृढ निश्चय अत्यंत गरजेचे असते.  अनेक वेळा लोक वजन कमी करण्यासाठी धडपडतात पण त्यांच्या छोट्या चुका त्यांच्या आणि फिटनेसमध्ये मोठा अडथळा बनतात. अशा परिस्थितीत या चुका वेळीच सुधारण्याची गरज आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चुकांबद्दल सांगितले आहे. ऋजुताकडून जाणून घ्या वजन कमी करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

ऋजुता दिवेकरच्या हेल्थ टिप्स 

  • ऋजुताच्या मते, वजन कमी करणे आपले एकमेव ध्येय बनवू नका.
  • शरीराला वजन कमी करण्याच्या प्रवासाशी जुळवून घेण्यासाठी 12 आठवडे लागतात. अशा परिस्थितीत शरीराच्या या अनुकूलन कालावधीकडे पराभव किंवा अपयश म्हणून पाहू नका.
  • व्यायामाला शिक्षा बनवू नका. व्यायामाकडे शिक्षा म्हणून पाहणे ही मोठी चूक असल्याचे ऋजुता म्हणते.
  • ऋजुताच्या म्हणण्यानुसार, अन्न खाणे गुन्हा ठरवू नका.
  • प्रत्येक पायरी, प्रत्येक कॅलरी आणि प्रत्येक किलोचा मागोवा ठेवू नका.
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

अशा प्रकारे वजन कमी होईल

  • वजन कमी करण्यासाठी काय करावे, यावर ऋजुता सांगते की, भूकेनुसार खा.
  • व्यायामासाठी वेळ काढा.
  • रोज वेळेवर झोपण्याची सवय लावा.
  • जेव्हा तुम्ही काहीही खात किंवा पिता, तेव्हा सस्टेनिबिलिटी लक्षात ठेवा.
  • आयुष्याचा आनंद घ्यायला विसरू नका. आपल्या मित्रांसह, कुटुंबासह आणि प्रवास आणि कामाचा आनंद घ्या.

अशा प्रकारे तुम्ही निरोगी राहाल

ऋजुता तिच्या अकाऊंटवर अनेक प्रकारच्या टिप्स शेअर करत असते आणि अलीकडेच तिने पावसाळ्यात कोणते पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतील यावर एक पोस्टही शेअर केली आहे. ऋजुताच्या मते, पावसाळ्यात आठवड्यातून 2 ते 3 वेळा उकडलेले शेंगदाणे, डाळी, मका, सुरण, अरबी, काकडी आणि भोपळा इत्यादी खावे. याशिवाय राजगीर, कट्टू इत्यादी बाजरीही आठवड्यातून एकदा खाऊ शकता.

वेट लॉस प्रवास आहे जबाबदारी नाही 

वजन कमी करणे हा एक सुखकर प्रवास आहे. तो जबाबदारी समजून त्रासदायक करू नका असं न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते. ऋजुता दिवेकर सोशल मीडियावर वजन कमी करण्याच्या संदर्भात अनेक व्हिडिओ शेअर करत असते. आपल्या पुस्तकातूनही काय खावे आणि काय टाळावे हे सांगितलं आहे.