Ghee taking benefits: : सकाळी उठल्यावर आपण काय करतो? खातो ? आपली लाईफस्टाईल (lifestyle) कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.बऱ्याचदा कामावर लवकर पोहचायचं असत त्यात वेळेत नाश्ता होत नाही किंवा घाईघाईत आपण थोडंच काहीतरी खातो. पण याचा परिणाम आरोग्यावर होतो. पण त्यातूनही आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर, काही गोष्टी ज्या आयुर्वेदात सांगितल्या आहेत त्या आपण ऐकल्या तर आरोग्य नक्कीच सुधारेल. रोज सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खाल्ल्याने त्याचे खूप फायदे शरीराला होतात आणि त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेउया. (health tips weight loss one spoon ghee early morning will help )
रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे (health benefits of ghee intake)
1. चमकदार त्वचा
साजूक तूपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरूज्जीवित होतात. यामुळे त्वचा चमकदार होते. सोबतच तूपामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
2. लठ्ठपणा
साजूक तूप शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदतकरतात. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते. सकाळी उठल्यावर या '4' गोष्टी पाळा, वजन घटवा
3. मेंदूला अॅक्टिव्ह करण्यास मदत
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित तूप खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
4. केस मजबूत होतात
अनेकांना केसगळतीचा त्रास जाणवतो. हार्मोनल बदल, पोषक आहाराचा अभाव, प्रदूषण, धूर, धूळ यामुळे केसांचे नुकसान होते. हळूहळू केस विरळ होतात. म्हणूनच केसांना मजबूत आणि घनदाट करण्यासाठी आहारात साजूक तूपाचा समावेश करावा.
अति तेथे माती हा नियम आहारालाही लागू आहे. त्यामुळे साजूक तूप आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात समावेश करताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. (health tips weight loss one spoon ghee early morning will help)