मुंबई : दगदगीच्या दिनचर्यतून काही वेळ सुट्टी घ्या, कारण या सुट्ट्या तुम्हाला फक्त स्ट्रेस कमी करायला नव्हे, तर यामुळे हृदयरोग होण्याच्या धोक्यापासून ही वाचवतात. मनोविज्ञान आणि आरोग्य मासिकात प्रकाशित एका अध्ययनात सांगितले की, सुट्ट्या तुमचं मेटाबॉलीज्म कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोग होण्याच्या धोका कमी होतो.
अमेरिकेत असलेल्या सिरॅक्यूज विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रायस ह्यू्रस्का म्हणाले, त्यांनी बघितले की ज्या लोकांनी गेल्या १२ महिन्यात सतत सुट्ट्या घेतल्या आहेत. त्या लोकांमध्ये मेटाबॉलीज्म सिंड्रोम आणि त्यांचे लक्षणे होण्याची शक्यता कमी आहे.
ते म्हणतात, मेटाबॉलीजम सिंड्रोम हृदयरोग होण्याचे मुख्य कारण आहे. जर तुमच्यात हे जास्त आहे, तर तुम्हाला हृदयरोग होण्याचा धोका अधिक आहे.
हे महत्वपूर्ण आहे, कारण ते वास्तविकतेत लोकांना बघत आहेत की, जे लोक सुट्टी घेतात त्यांच्यात हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते, कारण मेटाबॉलीजमची लक्षणे बदलू शकतात किंवा त्यांना कायमस्वरूपी काढून टाकू शकतात.