High cholesterol Hand symptoms: शरीरातील कोलेस्टेरॉलची (High cholesterol) पातळी वाढली की त्या संबंधित व्यक्तीला हृदयाचे आजार किंवात हार्ट अटॅकला (Heart Attack) सामोरं जावं लागतं. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की, हृदयविकार आणि स्ट्रोकचा यांचा धोकाही बळावतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे जगातील एक तृतीयांश लोकांना हृदयाशी संबंधित विविध आजारांना सामोरं जावं लागतं. शरीरात वाढलेलं उच्च कोलेस्ट्रॉल हे अधिक धोकादायक मानलं जातं, कारण या समस्येची शरीरात कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. याला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. मात्र उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणं ही तुमच्या हातामध्येही दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती.
तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं की, तुमच्या नखांचा रंग बदलतो. यावेळी तुमच्या नखांचा रंग पिवळा दिसू शकतो. याचा अर्थ तुमच्या शरीरात योग्यरित्या रक्त-प्रवाह होत नाहीये. शरीरात योग्य प्रकारे रक्त पुरवठा झाला नाही की, नखांचा रंग पिवळ होऊ लागतो.
तुमच्या शरीराच्या काही भागांमध्ये रक्तपुरवठा पुरेश्या प्रमाणात झाला नाही की, तुमच्या हाताला मुंग्या येण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या शरीरातील अवयवांना योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही. अशावेळी हाताला मुंग्या येऊ शकतात.
तुमच्या शरीराल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, रक्तवाहिन्या ब्लॉक देखील होतात. अशावेळी तुमच्या हातांमध्ये अचानक वेदना जाणवू शकतात. जर तुम्हालाही अशा वेदना जाणवल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखणं फार महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते आणि हात आणि पायांना रक्तपुरवठा कमी होतो. या परिस्थितीला पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) असं म्हटलं जातं. या समस्येमध्ये तुम्हाला हात-पायांमध्ये खूप वेदना जाणवू लागतात.
मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, कोणतंही काम करताना हात-पाय दुखत असतील, तर हे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचं लक्षण अशी शकतं. यावर वेळीच उपचार न केल्यास याचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे.