Coastal Road Project: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एक घोषणा केली आहे. कोस्टल रोडचा विस्तार करण्यात येणार आहे. नरीमन पाँइट ते भाईंदर-विरारपर्यंत कोस्टल रोड नेण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं दक्षिण मुंबई ते विरार हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करता येणार आहे. यासाठी जपान सरकार 40 हजार कोटी कर्ज देणार आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
नरीमन पॉइंट ते विरार प्रवास 40 मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरू आहे. कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे. तसंच. वाढवण येथेही बंदर होत आहे. त्यामुळं या भागांचा मोठा विकास होणार आहे. या भागाचे चित्र बदलणार आहे. वाढवण बंदर झाल्यामुळं कोळी बांधव यांचा विकास होणार आहे. कोळी बंधू समृद्ध होतील. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी निल क्रांती योजना आणली. त्यामुळं कोळी बांधवांना कर्ज मिळू लागले. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात बदल होऊ लागले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नरीमन पॉइंट ते विरार हा प्रवास रस्तेमार्गे करायचा झाल्यास साडेतीन तासांचा अवधी लागतो. पण आता अवघ्या पाउण तासात प्रवास पूर्ण करणे शक्य होणार आहे. कोस्टल रोडमुळं हे अंतर 65 किमीवर येईल, असं अंदाज आहे. नरीमन पॉइंट ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोड सेवेत दाखल झाला आहे. तसंच, वांद्रे ते वर्सोवा मार्गावरील कामही प्रगतीपथावर आहे. तिथूनच पुढे वर्सोवावरुन विरारपर्यंत कोस्टल रोडचा विस्तार केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. कोस्टल रोडमुळं दक्षिण मुंबई ते विरार हे अंतर जोडलं जाणार आहे.
आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलभावाने घेतल्या नाहीत. समृद्धी महामार्गा प्रमाणेच विरार अलिबाग कॉरिडॉर साठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमिनी घेतल्या जातील असेही त्यांनी सांगितलं. आचार संहिता संपताच बाळगंगा धरण प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.