High Cholesterol : फीट अँन्ड फाईन प्रत्येकाला रहायला आवडतं. मात्र सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडतात. यामधील एक समस्या असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ). रक्तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते. यामधील एक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad Cholesterol ) .
खराब कोलेस्टेरॉल अतिशय धोकादायक मानलं जात असून जर. धमन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलचे ( Cholesterol ) प्रमाण वाढलं तर हृदयापर्यंत पुरेसा रक्तपुरवठा पोहोचत नाही. परिणामी व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ) पातळी कमी करण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली चांगली असली पाहिजे. जर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) जास्त असेल तर त्यासाठी तुम्ही काही गोष्टींचं सेवन केलं पाहिजे.
तुम्हाला आज अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) ची पातळी आपोआप कमी होऊ लागते.
मासे- ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे काही माशांमध्ये आढळून येतं. जर तुम्ही मासे खात नसाल तर तुम्ही फिश ऑईलच्या कॅप्सूलचं सेवन करू शकता.
नट्स
बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि इतर नट्स खाणं तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. नट्समध्ये अतिरिक्त पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाचे संरक्षण होतं. शिवाय कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात.
बीन्स
बीन्समध्ये फायबरचं प्रमाण असून ते पचायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्ही बीन्स खाल्ले तर तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. शिवाय यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचाही धोका नसतो.
प्लांट बेस्ड फूड्स
प्लांट बेस्ड फूड्स म्हणजेच वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांमध्ये पालक, वाटाणे, टोफू या पदार्थांचा समावेश होतो. या सर्वांमध्ये पुरेसे पोषक घटक आढळतात. हे पदार्थ खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)