दिल्ली : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट सुरु आली. 37 रुग्णालयाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय आहे की, कोरोनाच्या या लाटेत 44 वर्षे वयोगटातील तरुण या लाटेत अधिक संक्रमित झालेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, 'कोरोनाच्या या लाटेत रुग्णांमध्ये घसा खवखवण्याची समस्या अधिक दिसून आली.'
बलराम भार्गव पुढे म्हणाले, कोरोनाच्या गेल्या लाटेच्या तुलनेत, सरासरी 44 पेक्षा कमी वय असलेल्या लोकांना या लाटेत जास्त संसर्ग झाल्याचं दिसून आलं. यापूर्वी लाटांमध्ये संक्रमित असलेल्यांतं सरासरी वय 55 वर्षे होतं. हा निष्कर्ष कोविड-19च्या नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्रीमधून आला आहे, ज्यामध्ये 37 रूग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांबद्दल डेटा गोळा करण्यात आला आहे.
भार्गव यांच्या सांगण्यानुसार, "आम्ही दोन वेळा अभ्यास केला. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर असा एक काळ होता, जेव्हा डेल्टा व्हेरिएंट पीकवर होता. दुसरा कालावधी 16 डिसेंबर ते 17 जानेवारी असा होता, ज्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची अधिक प्रकरणं दिसून आली होती."
रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या 1,520 रूग्णांचं विश्लेषण करण्यात आलं. या तिसऱ्या लाटेदरम्यान त्यांचं सरासरी वय सुमारे 44 वर्षे होते. डॉ. भार्गव म्हणाले, "या लाटेत औषधांचा वापर कमी झाल्याचंही आम्हाला आढळून आलं.