close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

घरगुती उपायांनी दूर करा चामखीळ

Updated: Sep 11, 2019, 01:56 PM IST
चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

मुंबई : अनेकांना अंगावर चामखीळ येतात. काहींना ते अधिक प्रमाणात येतात तर काहींना काही थोड्या प्रमाणात येतात. चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतात.

सफरचंदचं व्हिनेगर: चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने चिमखिळीवर हे व्हिनेगार लावा. काही दिवसातच चामखिळीचा रंग बदलून ते नष्ट होईल.

लिंबाचा रस: लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.

बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.

अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे.

बेकिंग सोडा: चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा.

लसून: लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा.