या घरगुती उपायांंनी झटपट दूर करा मायग्रेनचा त्रास

मायग्रेनचं दुखणं अत्यंत त्रासदायक असतं. 

Updated: May 22, 2018, 07:59 PM IST
या घरगुती उपायांंनी झटपट दूर करा मायग्रेनचा त्रास  title=

मुंबई : मायग्रेनचं दुखणं अत्यंत त्रासदायक असतं. अचानक डोकेदुखीचा त्रास वाढल्यास कोणत्याच कामामध्ये लक्ष देता येता नाही. सतत जाणवणारी डोकेदुखी भविष्यात मायाग्रेनचं रूप धारण करते. यामुळे त्रास अधिक वेदनादायी होतो. मायग्रेनचा त्रास असल्यास तुम्हांला वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र त्यासोबत काही घरगुती उपायांनीदेखील मायाग्रेनचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. म्हणूनच या घरगुती उपायांनी मायग्रेनचा त्रास आटोक्यात ठेवा. 

 घरगुती उपाय कोणते ?   

मायग्रेनचा त्रास तुम्हांला जाणवत असल्यास नियमित शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करणं फायदेशीर ठरू शकते. साजूक तुपाचे थेंब नाकात टाका. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.  
 
 नियमित सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास मायग्रेनचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 
 
 तुमचा डोकेदुखीचा त्रास अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्यास ग्लासभर दुधात काळामिरी पावडर मिसळा. या मिश्रणाने मायग्रेनचा त्रास कमी होतो.  
 
 लिंबाच्या साली उन्हात सुकवा. आता या सालींची पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर लावा. या घरगुती उपायाने आराम मिळतो. 
 
 चमचाभर आल्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो.