मुंबई : त्वचेचा रंग ठरवण्यासाठी मेलॅनिन हा घटक सर्वात महत्त्वाची भूमिका साकारतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा त्वचेचा रंग अधिक गडद होतो. या समस्येला हायपर पिंगमेंटेशन असेही म्हणतात.
हळूहळू विशिष्ट भाग अधिक गडद होण्यास सुरूवात होते. प्रामुख्याने चेहर्यावर हायपरपिंगमेंटटेशनमुळे त्वचा काळवंडणं अनेकींना सौंदर्याच्या दृष्टीने नकोसं वाटतं. यावर मात करण्यासाठी अनेकदा ब्युटी ट्रीटमेंटसची मदत घेतली जाते. महागड्या ब्युटी ट्रीटमेंटपेक्षा काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.
लिंबातील सायट्रिक अॅसिड त्वचा ब्लिच करण्यास मदत करतात. नियमित लिंबाचा त्वचेवर वापर केल्यास यामुळे हायपर पिगमेंटेशनचा त्रास दूर करण्यास मदत होते.
चेहर्यावर लिंबाचा रस लावून 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. संवेदनशील त्वचा अस्णार्यांनी लिंबाचा रस थेट त्वचेवर लावणं त्रासदायक ठरू शकते अशावेळेस लिंबामध्ये थोडं पाणी मिसळून ते त्वचेवर लावणं फायदेशीर आहे.
बटाट्यामध्येही ब्लिचिंग घटक मुबलक प्रमाणात असतात. चेहर्यावर बटाट्याचा रस लावल्याने हायपर पिगमेंटटेशनचा त्रास कमी होतो.
हायपर पिंगमेंटेशनचा त्रास कमी करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगरदेखील फायदेशीर आहे. यामधील अॅसिडीक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवण्यास मदत करतात.
कोरफडीचा गरदेखील त्वचेसाठी वरदानचं आहे. मृत पेशींचा थर हटवून नव्या पेशींना पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. नियमित कोरफडीचा गर त्वचेवर लावल्यास हायपर पिगमेंटशनच्या समस्येपासून सुटका मिळते.