अक्कलदाढीचं दुखणं सुसह्य करायला फायदेशीर '4' घरगुती उपाय

  अक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं. 

Dipali Nevarekar | Updated: Apr 18, 2018, 08:39 AM IST
अक्कलदाढीचं दुखणं सुसह्य करायला फायदेशीर '4' घरगुती उपाय  title=

मुंंबई :  अक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं. अचानक आणि तीव्र वेदनांचा त्रास असल्याने काहीवेळेस या दुखण्यामध्ये खाणं-पिणंही कठीण होऊन बसतं. सामान्यपणे अक्कलदाढ ही 17-25 या वयात येते. पण पंचविशी पुढेही अक्कलदाढ येऊ शकते. मग या अक्कल दाढीचं दुखणं आटोक्यात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकते.  

अक्कल दाढीचं दुखणं सुसह्य कसं कराल ? 

#1 दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो. 

#2 खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.  

#3 चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या  बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  

#4 दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग.  लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील कीटाणूंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात. 
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. कापसाच्या बोळ्याने लवंगाचे ते दाढेजवळ धरून ठेवा.