कोरोनाप्रमाणे monkeypox जगभरात हाहाकार माजवणार? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

मंकीपॉक्स हा संसर्ग कोरोनासारख्या महामारीचं रूप घेणार का असे प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत

Updated: May 25, 2022, 06:29 AM IST
कोरोनाप्रमाणे monkeypox जगभरात हाहाकार माजवणार? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत title=

मुंबई : कोरोनानंतर आता संपूर्ण जगावर मंकीपॉक्सचा धोका आहे. WHO ने आत्तापर्यंत कॅनडा, स्पेन, इस्रायल, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मंकीपॉक्सची 90 हून अधिक प्रकरणं नोंदवली आहेत. दरम्यान मंकीपॉक्स हा संसर्ग कोरोनासारख्या महामारीचं रूप घेणार का असे प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंकीपॉक्स संसर्गाबाबत चिंता व्यक्त केलीये आहे. तर अमेरिकेच्या आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मंकीपॉक्समुळे जगात कोविड-19 सारखी महामारी उद्भवणार नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड अप्पर चेसापीक हेल्थचे उपाध्यक्ष डॉ. फहीम युनूस म्हणाले, मंकीपॉक्सची प्रकरणं चिंताजनक आहेत, परंतु कोरोनाप्रमाणे महामारी बनण्याचा धोका शून्य टक्के दिसून येतो. SARS-CoV-2 सारखा मंकीपॉक्सचा व्हायरस नवीन नाही.

डॉ. फहीम यांनी पुढे सांगितलं की, जगाला मंकीपॉक्सबद्दल अनेक दशकांपासून माहिती आहे. मंकीपॉक्सचा व्हायरस सहसा जीवघेणार नसतो. शिवाय हा व्हायरस कोरोनापेक्षा कमी संसर्गजन्य आहे.

सेक्सुअल कॉन्टेक्टमुळे पसरू शकतो मंकीपॉक्स

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून विकसित देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक 'एक रँडम घटना' म्हटली आहे. नुकत्याच झालेल्या युरोपमधील दोन लाटांमध्ये लैंगिक कॉन्टेक्टमुळे पसरल्याची भीती व्यक्त केली जातेय.