तुम्ही एका दिवसात किती Pushups मारताय? जाणून घ्या योग्य आकडा

आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पुशअप्स (Pushups) खूप फायदेशीर असतात. म्हणूनच जिम (Gym) जाणारे असोत किंवा कुस्तीपटू असो प्रत्येकाला पुशअप मारणं आवडतं. तुम्ही घरी किंवा कोठेही पुशअप (Pushups at home) करू शकता. हा व्यायाम जितका प्रभावी आहे तितकाच तो करण्यासही सोपा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की एका दिवसात किती पुशअप्स (Daily Pushups) करावं आणि पुश अपचे काय फायदे आहेत?

Updated: Jan 21, 2023, 09:00 PM IST
तुम्ही एका दिवसात किती Pushups मारताय? जाणून घ्या योग्य आकडा title=

Daily Pushups : आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पुशअप्स (Pushups) खूप फायदेशीर असतात. म्हणूनच जिम (Gym) जाणारे असोत किंवा कुस्तीपटू असो प्रत्येकाला पुशअप मारणं आवडतं. तुम्ही घरी किंवा कोठेही पुशअप (Pushups at home) करू शकता. हा व्यायाम जितका प्रभावी आहे तितकाच तो करण्यासही सोपा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की एका दिवसात किती पुशअप्स (Daily Pushups) करावं आणि पुश अपचे काय फायदे आहेत?

जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की एका दिवसात किती पुश अप केले पाहिजेत तर याचं उत्तर म्हणजे याला कोणताही नियम नाही. दरम्यान एक्सरसाईज करणाऱ्या लोकांना विचारलं असता ते म्हणाले की, निरोगी व्यक्ती एका वेळी सरासरी 20-25 पुशअप्स करू शकते. तर नियमित सराव करून, ही संख्या 40-50 किंवा त्याहून अधिक वाढवली जाऊ शकते.

पुश-अप्स करण्याचे फायदे

  • पुश-अप्स केल्याने तुमच्या शरीराच्या वरती बाजू मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये छाती, खांदे तसंच हात मजबूत होण्यास मदत मिळते. 
  • जर पुश-अप योग्य प्रकारे केले असलील तर अपर बॉडीसोबत पोटांच्या स्नायूंसाठी देखील फायदेशीर ठरते. यामुळे शरीराची स्थिरता देखील वाढते.
  • तुम्ही कार्डिओ वर्कआउटमध्ये पुश-अप देखील समाविष्ट करू शकता. असं केल्याने तुमचे हृदयाचा वेग वाढून रक्त पंप करण्याची क्षमता वाढते.
  • पुश-अप्स हा शारीरिक वजन उचलण्याचा व्यायाम आहे, त्यामुळे हाडं मजबूत होण्यास देखील मदत होते.
  • पुश-अप केल्यामुळे मणक्याचं हाड सरळ करण्यात मदत होते. ज्यामुळे आपल्या शरीराची ठेवणं म्हणजेच बॉडी पोश्चर सुधारतं.