मुंबई : पिरीयड्स येणं ही महिलांच्या आरोग्याची एक सामान्य परंतु महत्वाची प्रक्रिया आहे. पीरियड्स दरम्यान, महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी. या कालावधी दरम्यान, स्त्रियांच्या मनात एक प्रश्न हमखास येतो की, मासिक पाळीदरम्यान नेमकं किती तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलला पाहिजे?
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एकाच पॅडचा बराच काळ वापर केल्यास योनी मार्ग आणि त्याच्या सभोवतालच्या त्वचेला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी पिरीयड्समध्ये योग्य वेळी पॅड बदललं पाहिजे.
पिरीयड्सच्या दिवसात महिलांनी किती वेळा पॅड्स बदलावं? याबद्दल कोणतीही निश्चित उत्तर नाही. कारण हे पिरीयडमध्ये होणार्या रक्ताच्या प्रवाहावर अवलंबून असते. साधारणपणे, महिलेचा कालावधी एकूण 7 ते 8 दिवस असतो, त्यापैकी पहिल्या 2 ते 3 दिवस रक्तस्त्रावाचा प्रवाह जास्त असतो. त्यामुळे पॅड कधी बदलावं हे स्तियांवर अवलंबून असतं.
American College of Obstetricians and Gynecologistsच्या नुसार, मासिक पाळी दरम्यान सामान्य रक्तस्त्राव होत असल्यास स्त्रियांनी 4 ते 8 तासांनंतर पॅड बदललं पाहिजे.
बाजारात विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार पॅड निवडू शकता. परंतु लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही कॉटनचे पॅड वापरावे. सुगंधित आणि फॅन्सी मटेरियलपासून बनवलेल्या पॅडमुळे संसर्ग होऊ शकतो. सॅनिटरी पॅडचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत-