मुंबई : आजच्या दगदगीच्या काळात स्ट्रेस आणि थकवा खूप होतो. त्यामुळे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते आणि मगं स्वत:ला सगळ्यांपासून दूर ठेवते. सगळ्या लोकांना स्ट्रेस आणि थकवा होतो, त्याचं फक्त एकमेव कारण बदलेली लाइफस्टाइल. तसेच दुसऱ्या गोष्टी देखील याला कारणीभूत आहेत. म्हणजेच कोणत्या तरी एका गोष्टीला घेऊन खूप विचार करणे. त्यामुळे अर्थातच हॉर्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो.
रोज दिवसातून २ वेळा कमीत कमी ५-५ मिनिटे मेडिटेशन करा. यामुळे सगळ्या नर्वस रिलॅक्स होतात आणि मनाला शांती मिळते. मेडिटेशनसाठी खाली मॅट टाकून बसा. कंबर सरळ ठेवा आणि हाताला आपल्या गुडघ्यांवर ठेवा. आता डोळे बंद करून लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. ५ मिनिट असे केल्याने सगळा थकवा आणि ताण निघून जाईल.
दिर्घ श्वास घेतल्याने आणि स्ट्रेचिंग केल्याने कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस आणि थकवा निघून जातो. जास्त विचार करू नका. जास्त विचार केल्यानेही व्यक्ती ताण तणावात जातो, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि दुसऱ्याविषयी व्यवहार पण बदलतो.
खूप वेळा असे होते की, ताण तणावात असलेले लोक एकटे राहतात. ते स्वत:ला दुसऱ्यांपासून लांब ठेवतात. मुळात असे करायला नको. ताणतणावापासून सुटका हवी असेल तर दुसऱ्या लोकांना भेटा त्यांच्यासोबत वेळ घालवा. असं केल्याने मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहिल.
जेव्हा तुम्हाला ताण येईल तुम्हाला थकवा जाणवत असेल, तेव्हा तुमच्या आवडीचे संगीत डोळे बंद करून ऐका. आवडीचे संगीत म्हणजे, पॉप आणि रॉक नव्हे, तर शांत आणि मनोरंजन, जे तुमच्या मनाला शांती देईल.
योग आणि ताईची (चीनी मार्शलाट ) मुळेही तणाव आणि थकवा दूर करण्यास मदत मिळते. जर ताईची कला येत नसेल, तर फक्त योग पण चालेल. तणावाला दूर करण्यासाठी रोज अर्धा तास योगा करा.
मसाजमुळे ही तणाव कमी होतो. त्यासाठी डोक्याच्या मसाजपासून बॉडीची मसाज पण चालेल. मुख्य म्हणजे मसाज एक्सपर्ट कडूनच मसाज करा. या सोबत पौष्टीक आहार ठेवा. खूप फायदा होईल.