Low Blood Pressure In Marathi : अनेकांच्या बैठी जीवनशैलीमुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. कमी रक्तदाब (Low BP) ही देखील मोठी समस्या आहे. वाढत्या वयाबरोबरच रक्ताभिसरण योग्य नसल्यामुळे बहुतेक लोक कमी रक्तदाबाच्या समस्येला बळी पडतात. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे डोळ्यांसमोर अंधार येणे, हाता-पायांना घाम येणे, चक्कर येणे या समस्या सामान्य आहे.
पण या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या सर्व गोष्टींमुळे शरीरात रक्तपुरवठा कमी होतो. रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब (Low Blood Pressure) असाधारणपणे कमी झाला की रक्तदाब कमी चा त्रास जाणवतो. याला कमी रक्तदाब, अल्प रक्तदाब, हायपोटेन्शन किंवा कमी बीपी असेही म्हणतात. कमी रक्तदाब होणे ही हाय ब्लडप्रेश इतकीच गंभीर समस्या ठरु शकते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका. जर तुमचाही ब्लड प्रेशर लो असेल तर त्याची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या...
रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण म्हणजे 120/80 आहे आणि जर रक्तदाब हा 90/60 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. रक्तदाब कमी झाल्यास मेंदू आणि इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे उद्भवतात.