स्किन पिलिंगच्या समस्येवर रामबाण नैसर्गिक उपाय

ऋतूमानामध्ये बदल झाला की सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. 

Updated: Jul 22, 2018, 12:55 PM IST
स्किन पिलिंगच्या समस्येवर रामबाण नैसर्गिक उपाय  title=

मुंबई : ऋतूमानामध्ये बदल झाला की सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. साथीचे आजार जसे पसरतात तसेच त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो. अनेकांना स्किन पिलिंगचा त्रास होतो. वेळीच लक्ष न दिल्यास हा त्रास भयंकर स्वरूप घेऊ शकतो. स्किन पिलिंगचा त्रास वेदना नसल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र घरगुती उपायांनी त्यावर मात करण्यास मदत होते. 

स्किन पिलिंगचा त्रास कसा ठेवाल आटोक्यात ? 

रोज बाऊलभर कोमट पाण्यात 10 मिनिटं हात बुडवा. तुमच्या इच्छेनुसार यामध्ये मध आणि लिंबाचा रसदेखील मिसळू शकता. या पाण्यामध्ये हात बुडवल्याने हाताची त्व्चा मुलायम होते आणि शुष्क त्वचा होण्याचं प्रमाण कमी होते. 

व्हिटॅमिन ई युक्त तेल 

स्किन पिलिंगचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ईयुक्त तेलाचा वापर करा. नियमित या तेलाच्या मालिशामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. 

ओट्स 

बाऊलभर कोमट पाण्यामध्ये ओट्स मिसळा. ओट्स मऊ झाल्यानंतर 10-15 मिनिटं त्यामध्ये हात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हात साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. हात कोरडे केल्यानंतर मॉईश्चरायझर लावा. 

कोरफड 

झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर हातावर लावा. काही वेळ मसाज करून झोपावे. सकाळी कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतर मॉईश्चराझर लावा. यामुळे स्किन पिलिंगचा त्रास कमी होतो. 

स्किन पिलिंगचा त्रास कायम राहिल्यास केवळ नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहू नका.  वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.