Intimate Health: तुमचं रिलेशन एव्हरग्रीन ठेवण्यासाठी 'ही' गोष्टही आहे महत्त्वाची

तुमच्या नात्यातील सेक्श्युअल स्पार्क (How to keep your sexual spark on) पुन्हा पेटवण्यासाठी नक्की काय करावं?

Updated: Sep 13, 2022, 11:08 PM IST
Intimate Health: तुमचं रिलेशन एव्हरग्रीन ठेवण्यासाठी 'ही' गोष्टही आहे महत्त्वाची  title=

Intimate Relationship Tips: कोणत्याही नात्यातील भिस्त ही एकमेकांवरील विश्वासावर, प्रेमावर आणि समजूतदारपणावर टिकून असते. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला एकमेकांसोबत जोडून ठेवते. नात्यात पार्टनरसोबतची शारीरिक जवळीक देखील अत्यंत महत्त्वाची ठरते. नाहीतर अनेक नात्यांमध्ये केवळ याच कारणाने दुरावा येतो. नात्यातील गोडवा टिकवायचा असल्यास या बातमीत आम्ही अशा काही खास टिप्स देणार आहोत, ज्या तुमचं नातं एव्हरग्रीन ठेवण्यास मदत करेल.  

नात्यातील नव्या नवलाईचे दिवस संपले की अनेक जोडप्यांमध्ये एकमेकांप्रतीचं लैंगिक आकर्षण कमी होतं. अशात तुमच्या नात्यातील सेक्श्युअल स्पार्क (How to keep your sexual spark on) पुन्हा पेटवण्यासाठी नक्की काय करावं? डॉक्टर याबाबत काय सांगतात ते जाणून घेऊयात. 

नात्यातील लैंगिक (Sexual Attraction) आकर्षण परत आणण्याच्या टिप्स

आकर्षण कमी होणं सामान्य 

एकमेकांमधील लैंगिक आकर्षण कमी होणं अतिशय सामान्य बाब आहे. प्रत्येक नात्याला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. मात्र तुमच्या नात्यातील गोडवा कशाने कमी झाला, हे जाणून घेणं गरजेचं आहे. नात्यात कशाने कडवटपणा आला हे समजल्यानंतरच तुम्ही यावर उपाय शोधून काढू शकतात.   

ताण तणाव दूर ठेवा 

दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे टोकाचे विचार असू  शकतात. अशात तुमच्यातील मतभेद जास्त वेळे कायम राहिल्यास याचा थेट परिणाम तुमच्या लैंगिक रिलेशनवर होऊ शकतो. यामुळे पार्टनरमधील सेक्श्युअल आकर्षण आणि इंट्रेस्ट कमी होऊ शकतो. तुमचे तुमच्या पार्टनरसोबतचे मतभेत नात्याला कुठे घेऊन चाललेत याबाबत विचार करा. अशात तुमच्या पार्टनरचे म्हणणे जाणून घ्या, तुम्ही तुमच्या कृतीत बदल करा. याने तुमचं हरवलेलं लैंगिक आकर्षण पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल . 

खुला संवाद होणं फायद्याचं 

तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये नेमकं कशामुळे बिनसलं हे जाणून घेतल्यानंतर याबाबत एकमेकांशी संवाद साधल्याने याबाबत तुमच्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. याने तुमचं लैंगिक आकर्षण वाढण्यास मदत होते. 

एकमेकांची मदत घ्या 

नेमका कशाने तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, हे जाणून घेऊन किंवा एकमेकांशी खुला संवाद साधल्यानंतरही तुमची समस्या सुटत नसेल तर एकमेकांची  मदत नक्की घ्या. तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक चिकित्सेची गरज असल्यास आपल्या पार्टनरला भरवशात घेऊन त्यादृष्टीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्यातील सेक्शुअल गोडवा परत आणण्यासाठी तुम्हाला हे फायद्याचं ठरू शकतं.

how to keep your intimate relation active with your partner useful tips for couples