नवी दिल्ली : आपली बदलेली जीवनशैलीचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, असे म्हणायला काही हरकत नाही. अपुरी झोप, अवेळी खाणे, ताण-तणाव त्याचबरोबर बैठे काम यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अनेकदा आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, उभं राहण्याने देखील वजन कमी होते. नवीन संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. दोन्ही पायांवर समान वजन टाकून व्यवस्थित उभे राहिल्याने अतिरिक्त वजन कमी होते. संशोधकांनी सांगितले की, बसण्याच्या तुलनेत उभे राहिल्याने मिनीटाला ०.१५ कॅलरीज अधिक बर्न होतात.
दिवसभरात सुमारे ६ तास बसण्यापेक्षा उभे राहिल्याने सुमारे ५४ अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. अमेरिकेतील मायो क्लिनिक इन रोचेस्टरच्या प्रोफेसर फ्रांसिस्को लोपेज जिमेनेज यांनी सांगितले की, उभे राहिल्याने फक्त कॅलरीज बर्न होत नाहीत तर हार्ट अॅटक, स्ट्रोक, मधूमेह होण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे उभे राहण्याचे फायदे अधिक आहेत.
स्थूलता, वाढलेले वजन हे अनेक आजारांचे मूळ आहे. त्यामुळे वजन नियंत्रित असणे गरजेचे आहे. वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय. ज्यामुळे सात दिवसात वजन कमी करुन तुम्ही सुडौल शरीर मिळवू शकता. ७ दिवसात वजन कमी करण्याचे सोपे उपाय....
या ७ दिवसात बेक्ड फूड अजिबात खावू नका. म्हणजेच केक, कुकीज. मर्फिस, ब्रेड असे पदार्थ खावू नका. त्याचबरोबर चिप्स, स्नॅक्स, बाहेरचे पदार्थ टाळा. तसंच अती गोड म्हणजे मिठाई वगैरे खावू नका. त्याऐवजी ताजी फळे खा.
तळलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज आणि मीठ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे तळलेले मासे, मांस खाणे टाळा. फ्रेंच फ्राईज, पोटॅटो चिप्स, ब्रेड पकोडा, समोसा असे पदार्थ खावू नका.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे ते टाळा. भरपूर पाणी प्या. बीअर, सॉफ्ट ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स, कॉफी, सोडा असे ड्रिंक्स टाळा. \
ऑफिस, प्रवासात आपण बसलेले असतो. म्हणजे अधिक वेळ आपण बसलेले असतो. मात्र या सात दिवसात शक्य तेवढं चाला. जिने चढा. जॉगिंग करा.
जर काही कारणास्तव तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर रोज कमीत कमी १० हजार पाऊले चाला. त्यासाठी दिवसभारात तुम्हाला १५ ते २० मिनिटं चालावे लागेल.
अशाप्रकारे तुम्ही सात दिवसात वजन कमी करु शकता. मात्र यात दिनर्चयेत सातत्य असणे गरजेचे आहे.