मच्छर चावण्याने लाल चट्टे येतात , 30 रुपयात तयार करा आयुर्वेदिक तेल, 100% गुणकारी

Home Remedies : पुन्हा एकदा मुंबईसह आसपासच्या परिसरात डासांनी हैराण केलंय. अनेक उपाय करून थकलात? तर आयुर्वेदिक डॉक्टर शाश्वत खात्री यांनी सांगितलेल्या 30 रुपयाच्या तेलाने खास मुळापासून कमी करा. (Mosquito Prevent Home Remedies) 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 25, 2023, 08:27 AM IST
मच्छर चावण्याने लाल चट्टे येतात , 30 रुपयात तयार करा आयुर्वेदिक तेल, 100% गुणकारी  title=

Home Remedies on Prevent Mosquito Bites : गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब झालं आहे. यासोबतच डासांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा लहान मुलांना डास चावल्यावर लाल चट्टे शरीरावर उठतात. मच्छर चावलेल्या ठिकाणी लहान मुले खाजवून जखम वाढवतात. (Mosquito Prevent Oil) डासांमुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही धोका निर्माण होतो. कारण ते केवळ चावतात असे नाही तर डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारखे गंभीर आजार पसरवतात.

लहान मुलांची त्वचा अतिशय संवेदनशील असल्याने, या चाव्यामुळे बाळांना खाज सुटू शकते आणि अस्वस्थता येते. तुमच्या मुलालाही डास चावल्यास आयुर्वेदिक सल्लागार आणि पंचकर्म तज्ज्ञ डॉ. शाश्वत खत्री यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी कडुलिंब आणि कापूर तेलाची रेसिपी दिली आहे.

आयुर्वेदिक डॉक्टरांचा उपाय

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr.Khatri's Shashwat Ayurvedam (@vaidya_mihir_khatri)

कडुलिंब-तेल

कडुलिंब आणि खोबरेल तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते मिक्स करून लावल्याने डास जवळ येत नाहीत. वास्तविक, कडुनिंबात अँटी-प्रोटोझोल संयुगे असतात, ज्यामुळे एक विचित्र वास येतो. या वासामुळे डास माणसांना स्पर्श करू शकत नाहीत आणि दूर राहतात.

कडुलिंब-कापूर तेल 

200 मिली नारळ तेल
५० ग्रॅम- ताज्या कडुलिंबाच्या पानांची पेस्ट, हवी असल्यास कडुलिंबाच्या पानांची पावडरही बनवू शकता.

कसे बनवावे

डासांपासून बचाव करण्यासाठी कडुलिंब कापूर तेल बनवणे खूप सोपे आहे.
सर्व प्रथम कढईत खोबरेल तेल घाला.
तेल गरम झाल्यावर त्यात कडुलिंबाच्या पानांची पेस्ट टाका.
तेलाचा रंग हिरवा होईपर्यंत मंद आचेवर उकळवा. हे होण्यासाठी सुमारे 15-20 मिनिटे लागतील.
कोमट झाल्यावर काचेच्या बाटलीत गाळून घ्या.
आता तेल थंड झाल्यावर त्यात कापूरचे ५ तुकडे टाका. काही वेळ ठेवल्यावर ते आपोआप वितळेल.

कडुलिंब, खोबरेल तेल आणि कापूर यापासून बनवलेले घरगुती तेल मुलांना डासांपासून तर सुरक्षित ठेवतेच शिवाय एक्जिमा, खाज आणि दादाच्या समस्याही दूर करतात. डोक्यातील कोंडा असो किंवा उवांची समस्या असो, सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे लावल्यानंतर डोक्यातील खाज सुटण्यापासून आराम मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की हे तेल त्वचेशी संबंधित समस्यांसाठी एक चांगला पर्याय आहे.

कसा कराल वापर

जेव्हाही तुमचे मूल बाहेर खेळायला जाते तेव्हा हे तेल त्याच्या अंगाला लावावे. तेल हळूवारपणे हाताला लावा मुलं तिकडे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. झोपेत असताना डास मुलांना खूप चावतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हे तेल अंगाला लावावे.