तुम्हाला हेअर मास्क कसा वापरायचा हे माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

हेअर मास्कमुळे केसांच्या अनेक समस्यांवर मात केली जाते.

Updated: Oct 18, 2022, 05:27 PM IST
तुम्हाला हेअर मास्क कसा वापरायचा हे माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... title=
If you dont know how to use a hair mask this news is for you nz

How to use a hair mask: बदलत्या काळानुसार केसांची निगा राखणे खूप गरजेचे झाले आहे. अनेकदा धावपळीत केसांची दररोज काळजी घेणे शक्य होत नाही. पण आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेल लावल्यास, डोक्याची मालीश केल्यास तुम्हाला चांगलाच रिझल्ट मिळतो. हल्ली लोकं हेअर मास्कचा देखील वापर करतात. हेअर मास्कमुळे केसांना महत्त्वाचे पोषण मिळत असते. हेअर मास्कच्या फायद्यांबद्दल जितके बोलले जाईल तितके कमी आहे. हेअर मास्क अर्धा तास ते एक तास केसांना लावल्यास केसांचे डीप कंडिशनिंग करण्याचे काम करते. 

हेअर मास्कमुळे केसांच्या अनेक समस्यांवर मात केली जाते. जर तुमच्या केसांमधील कोरडेपणा कमी करण्याचे काम करते. तुमच्या टाळूसाठीही हेअर मास्क चांगला असतो. केसांचे तुटणे, गळणे कमी करण्याचे काम देखील हेअर मास्क करत असते. हेअर मास्कचा वापरामुळे केस मऊ आणि मजबूत होतात. (If you dont know how to use a hair mask this news is for you nz)

आणखी वाचा - तुम्हाला दिवाळीत कसं घर सजवावे असा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी खास टिप्स...

 

केसांच्या पोतप्रमाणे हेअर मास्क निवडा -

सध्या बाजारात अनेक हेअर मास्क आले आहेत. मग अशावेळेस आपण कोणता मास्क घ्यावा हा खूप मोठा प्रश्न आपल्याला पडतो. हेअर मास्क निवडण्यासाठी तुमच्या केसांचा पोत माहित असणे आवश्यक आहे.  उदाहरणार्थ, कलर ट्रेड केसांसाठी कलर सेफ मास्क वापरावेत. त्याचप्रमाणे मध, केळी, जोजोबा तेल, केराटीन, एवोकॅडो तेल या नैसर्गिक घटकांचा वापर कोरडेपणासाठी करता येतो. तेलकटपणासाठी, तुम्ही टीट्री ऑइल किंवा चिकणमाती वापरू शकता जेणेकरून तेलाचा समतोल राखला जाईल आणि तेल शोषले जाईल. त्याचप्रमाणे पातळ केसांसाठी अंड्यातील पिवळ बलक, बायोटिन इत्यादी प्रथिने असलेले हेअर मास्क वापरता येतात. 

हेअर मास्क कसे वापरण्याची योग्य पद्धत

1. सर्वप्रथम केसांना शॅम्पू आणि कंडिशनर लावा जेणेकरून त्यामध्ये साचलेली घाण, तेल साफ होईल.
2. हेअर मास्क जेव्हा ओल्या केसांवर लावावे. केस जास्त ओले नसावेत याची काळजी घ्या.  टॉवेलमध्ये वाळल्यावर केसांवर मास्क लावा.
3. हेअर मास्क आपल्या बोटांनी किंवा ब्रशने लावा. मास्क लावताना लक्षात ठेवा की तुमच्या केसांच्या प्रत्येक स्ट्रँडला मास्क लागला पाहिजे. 
4. आता केसांवर ब्रशच्या साहाय्याने सेट करा. जेणेकरुन हेअप मास्क सगळ्या केसांवर पसरेल.   

आणखी वाचा - करवा चौथनंतर विकी कौशलचे तालरंग बदलले? कतरिनाला जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही घाम फुटेल

5. तो हेअर मास्क अर्ध्या तासापासून एक तासापर्यंत केसांनर तसाच ठेवा. 
6. आता तुमचे केस थंड आणि कोमट पाण्याने धुवा. गरम पाण्याचा वापर टाळा. 
7. आता टॉवेलमध्ये केस चांगले कोरडे करा. 

हेअर मास्कचे फायदे -

हेअर मास्क तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकतात आणि खराब झालेले केस देखील सुधारू शकतात. यामुळे कुरकुरीतपणा म्हणजेच कोरडेपणा कमी होतो आणि ते टाळूच्या आरोग्यासाठीही चांगले असते. हे केसांचे तुटणे आणि फाटणे दूर करते आणि केस मऊ करते. त्यामुळे केस वाढतात आणि मजबूतही होतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)