'या' 5 सवयी तुम्हाला म्हातारं बनवतात, आताच सुधारा आणि स्वत:ला तरुण ठेवा

काही सवयी या चांगल्या असतात तर काही सवयी या शरीराला हानी पोहोचवतात.

Updated: Nov 24, 2021, 02:01 PM IST
'या' 5 सवयी तुम्हाला म्हातारं बनवतात, आताच सुधारा आणि स्वत:ला तरुण ठेवा

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आयुषयात काही ना काही सवय असते. त्यांपैकी काही सवयी या चांगल्या असतात तर काही सवयी या शरीराला हानी पोहोचवतात. वाईट सवयी या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक तर असतातच, परंतु तुम्हाला माहित आहे का? की त्यासवयी तुम्हाला लवकर म्हातारे बनवु शकतात. परंतु जर आपण आपल्या जीवनशैलीची नीट काळजी घेतली तर वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा वेग कमी होऊ शकतो.

पब्लिक हेल्थ न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जगदीश खुबचंदानी यांनी अशा पाच वाईट सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या माणसाला झपाट्याने आपल्या म्हातारपणाकडे घेऊन जातात.

ताण

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीराची काळजी न केल्याने माणूस लवकर वृद्ध होऊ शकतो. ज्यामुळे माणूस काही मानसिक किंवा शारीरिक आजारांनाही बळी पडू शकतो. आपल्या लक्षात येत नाही, परंतु तणाव हा एक अतिशय घातक, तसेच सायलेंट किलर आहे. त्यामुळे दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर जास्त ताण घेणे टाळा.

पुरेशी झोप न मिळणे

पुरेशी झोप न मिळणे ही देखील एक मोठी समस्या आहे. ज्याचा तणावाशी खोल संबंध आहे. झोप आपल्याला तरुण राहण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. परंतु काही लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे, ज्याचे दुष्परिणाम भविष्यात दिसू शकतात.

खराब आहार

खराब आहार देखील जलद वृद्धत्वासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतो. सध्या लोकं बाहेरचे पदार्थ खातात, ज्यामध्ये सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आसतात, जे आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनल्या आहेत. ज्यामुळे लोकं वृद्धत्वकडे जाऊ लागले आहेत. पूर्वीच्या लोकांच्या आहारात या सगळ्या गोष्टींचा समावेश नसल्याने लोकं जास्त काळ आयुष्य जगत होते.

एक्टीव्ह न रहाणे

दैनंदिन जीवनशैलीत व्यायाम न करणे किंवा शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक्टीव्हनेसच्या कमतरतेमुळे, रोग माणसाला लवकर घेरतात आणि तो वेगाने वृद्धत्वाकडे जातो. व्यायाम न केल्याने जैविक, मानसिक आणि शारीरिक परिणाम असे तीन प्रकारे नुकसान होते

धूम्रपान आणि मद्यपान 

तणाव किंवा चिंता टाळण्यासाठी, बरेच लोक दारू, तंबाखू किंवा ड्रग्स सारख्या गोष्टींचे सेवन करू लागले आहेत. तसेच हा ट्रेंड आहे असे मानत याकडे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. त्यांच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो, परंतु याचे सतत आणि अतिसेवन केल्याने ते व्यक्तीला वृद्धत्वाकडे ढकलते. हे मेंदू आणि वजनाशी संबंधित समस्या वाढवून तुम्हाला गंभीर आजाराकडे ढकलू शकतात.

ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे, झी 24 तास याची कोणतीही पुष्टी करत नाही. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.